भारतीय अंतराळवीरांना मदत करणार
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय अंतराळवीरांना पुढील वर्षी अवकाशात पाठविण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) मदत करणार आहे. भारताच्या दौर्यावर असलेल्या ‘नासा’ प्रमुख बिल नेल्सन यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले, की नासा अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी मदत करेल; पण अंतराळवीरांची निवड ‘इस्रो’ करेल. यामध्ये ‘नासा’ची काहीच भूमिका असणार नाही, दोन संस्था मोहिमेवर काम करत आहेत. भारत आणि अमेरिका महत्त्वाचे सहयोगी देश आहे. त्यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये दोन्ही देश महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. मी 1986 मध्ये कोलंबिया स्पेस शटलमधून अंतराळयात्रा केली होती. त्यावेळी मी पहिल्यांदाच अंतराळातून भारत देशाला पाहिले होते. शटलमधून पहिल्यांदा श्रीलंका पाहिली, त्यानंतर हळूहळू नजर वरती गेल्यानंतर संपूर्ण भारत देश दिसला आणि हिमालय पर्वतही पाहण्यास मिळाला. संपूर्ण नजारा स्वर्गासारखा दिसत होता.
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचे कौतुक करत नेल्सन म्हणाले की, पुढील वर्षी अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध—ुवावर अनेक खासगी लँडर पाठवणार आहे. पण चंद्राच्या दक्षिण ध—ुवावर लँडर पाठवणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारत 2040 पर्यंत अंतराळ स्थानक बनवण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
राकेश शर्मांना भेटणार
आपल्या दौर्यात नेल्सन ‘इस्रो’च्या मुख्यालयाला भेट देणार आहे. त्याशिवाय भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचीही भेट घेणार आहेत. यावर नेल्सन म्हणाले की, मी माझ्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी खूपच उत्साही आहे. सोव्हिएत संघाची विभागणी होण्यापूर्वी मी राकेश यांना 1991 मध्ये भेटलो होता. त्यावेळी दोघांनी चांगली चर्चा केली आहे. मी त्यांच्याशी अनेकवेळा फोनवरून बोललो आहे.
The post भारतीय अंतराळवीरांना मदत करणार appeared first on पुढारी.
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय अंतराळवीरांना पुढील वर्षी अवकाशात पाठविण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) मदत करणार आहे. भारताच्या दौर्यावर असलेल्या ‘नासा’ प्रमुख बिल नेल्सन यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की नासा अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी मदत करेल; पण अंतराळवीरांची निवड ‘इस्रो’ करेल. यामध्ये ‘नासा’ची काहीच भूमिका असणार नाही, दोन संस्था मोहिमेवर …
The post भारतीय अंतराळवीरांना मदत करणार appeared first on पुढारी.