अमेठीतून स्मृती इराणी २३ हजार मतांनी पिछाडीवर!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघापैकी एक असणार्या उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. येथे केंद्रीय मंत्री व भाजप उमेदवार स्मृती इराणी या मतमोजणीत पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी निर्णायक २३ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
2019 च्या निवडणुकीत स्मृतींनी अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता. यावेळी राहुल यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवली आहे. काँग्रेसने अमेठी जिंकण्याची जबाबदारी गांधी घराण्याच्या निकटवर्तीय किशोरीलाल शर्मा यांच्याकडे दिली आहे.
अमेठीमध्ये झाले होते ५४ टक्के मतदान
अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान झाले होते.मतदानाची टक्केवारी ५४.३४ टक्के इतकी होती. प्रियांका गांधी यांनी स्वत: येथे किशोरी लाल यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त रॅलीही झाली. आता अमेठीतील जनता अखेर कोणाला खासदार म्हणून निवडून देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले हेाते.
अमेठी होता काँग्रेसचा बालेकिल्ला
२००४, २००९ आणि २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.


Home महत्वाची बातमी अमेठीतून स्मृती इराणी २३ हजार मतांनी पिछाडीवर!
अमेठीतून स्मृती इराणी २३ हजार मतांनी पिछाडीवर!
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघापैकी एक असणार्या उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. येथे केंद्रीय मंत्री व भाजप उमेदवार स्मृती इराणी या मतमोजणीत पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी निर्णायक २३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. 2019 च्या निवडणुकीत स्मृतींनी अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता. यावेळी राहुल यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून …