Weather Update : अवकाळी पाऊसोबत दाट धुके अन् गारठा
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर, पिंपरी-चिंचवडसह उपनगरात बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. मात्र, त्यानंतर शहरातील तापमानात घट होऊन बुधवारी सकाळी शहरात धुके पसरले होते. या धुक्यामुळे गारठा जाणवला. मात्र, सकाळी दहा वाजल्यानंतर धुके कमी झाले.
दिवाळीचा कालावधी आणि त्यानंतरचे काही दिवस शहरात हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. फटाके, बांधकामे आणि अन्य कारणांनी हवेची गुणवत्ता खालावून ती वाईट श्रेणीपर्यंत घसरली होती. मात्र, त्यानंतर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारून सामान्य स्थितीवर आली आहे. त्याशिवाय, हवेत सुखद गारवा निर्माण झाल्याने वातावरण आल्हाददायक झाली आहे. तसेच सायंकाळपासूनच हवेत गारवा जाणवू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारची सकाळ धुक्याच्या दुलईत उजाडली. शहराच्या विविध भागांमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र होते. मोठमोठ्या इमारतींचे वरचे मजले धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळाले. सकाळीच व्यायामासाठी फिरायला बाहेर पडणार्या नागरिकांना या धुक्याचा अनुभव घेता आला. पुढील दोन ते तीन दिवस शहर परिसरात सकाळच्या वेळी धुके राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
हेही वाचा
पुणेकरांनो, जरा जपून; धरणात चक्क सांडपाणी!
Pune News : पीएम आवासमध्ये भाडेकरुंचा घरोबा!
कोल्हापूर जिल्ह्यातील 1400 दूध संस्थांना अंतिम नोटिसा
The post Weather Update : अवकाळी पाऊसोबत दाट धुके अन् गारठा appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर, पिंपरी-चिंचवडसह उपनगरात बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. मात्र, त्यानंतर शहरातील तापमानात घट होऊन बुधवारी सकाळी शहरात धुके पसरले होते. या धुक्यामुळे गारठा जाणवला. मात्र, सकाळी दहा वाजल्यानंतर धुके कमी झाले. दिवाळीचा कालावधी आणि त्यानंतरचे काही दिवस शहरात हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. फटाके, बांधकामे आणि अन्य …
The post Weather Update : अवकाळी पाऊसोबत दाट धुके अन् गारठा appeared first on पुढारी.