मतमाेजणीत ‘चढ-उतार’, शेअर मार्केटमध्‍ये घसरगुंडी

पुढारी ऑनलाइंन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अटीतटीची लढत दिसत आहे. याचे परिणाम शेअर बाजारावर उमटले. आज सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली होती. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 183 अंकांच्या घसरणीसह उघडला. लगेचच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला आणि 74,753 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीही 84 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 539 अंकांपेक्षा अधिक घसरून 22,724.80 वर आला …
मतमाेजणीत ‘चढ-उतार’, शेअर मार्केटमध्‍ये घसरगुंडी

Bharat Live News Media ऑनलाइंन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अटीतटीची लढत दिसत आहे. याचे परिणाम शेअर बाजारावर उमटले. आज सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली होती. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 183 अंकांच्या घसरणीसह उघडला. लगेचच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला आणि 74,753 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीही 84 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 539 अंकांपेक्षा अधिक घसरून 22,724.80 वर आला आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी इंडिया VIX २६ वर हाेता.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ४ जून) सकाळी आठला प्रारंभ झाला . सुरुवातीच्‍या मतमोजणी भाजप प्रणित एनडीएने निर्णायक आघाडी घेतली हाेती. मात्र नंतर इंडिया आघाडीनेही जाेरदाक कमबॅक केले. सुरुवातीच्‍या मतमाेजणीत एनडीए पिछाडीवर गेले आणि याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 183 अंकांच्या घसरणीसह उघडला. लगेचच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला आणि 74,753 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीही 84 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 539 अंकांपेक्षा अधिक घसरून 22,724.80 वर आला आहे.

Sensex slumps by over 2500 points; currently trending at 73,775.70 and down by 2693.098 points. pic.twitter.com/oDn3KQtVe4
— ANI (@ANI) June 4, 2024

 
सोमवारी बाजार 3 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला होता. सोमवारचे व्‍यवहार बंद होताना सेन्‍सेक्‍स तब्‍बल 2,507.47 (3.39%) अंकांनी वधारत 76,468.78 वर तर निफ्‍टी 776.55 (3.45%) अंक उसळी घेत 23,307.25 अशा सर्वकालीन उच्‍चाकांवर बंद झाला होता.
सोमवारी सेन्सेक्स, निफ्टीने अनुभवला होता सर्वकालीन उच्चांक
लोकसभा निवडणुकीच्‍या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलने केंद्रात पुन्‍हा एकदा भाजप नेतृत्त्‍वाखालील एनडीए सरकार स्‍थापन होण्‍याचे संकेत दिले आहेत. याचे सकारात्‍मक परिणाम आज (3 जून) देशांतर्गत शेअर बाजारात उमटले. निफ्टी प्रथमच 23,300 च्या वर उघडला. निफ्टी बँकेत सुमारे 1600 अंकांची वाढ दर्शवली. तर सेन्सेक्सही पहिल्यांदाच 76,000 च्या पुढे व्यवहार करताना दिसला. या तेजीच्‍या वार्‍यामुळे पहिल्या दोन तासात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती 12 लाख कोटी रुपयांनी वाढली. सोमवारचे व्‍यवहार बंद होताना सेन्‍सेक्‍स तब्‍बल 2,507.47 (3.39%) अंकांनी वधारत 76,468.78 वर तर निफ्‍टी 776.55 (3.45%) अंक उसळी घेत 23,307.25 अशा सर्वकालीन उच्‍चाकांवर बंद झाला होता.