जळगाव, रावेर लोकसभेसाठी स्मिता वाघ, रक्षा खडसे आघाडीवर
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जिल्ह्यातील जळगाव व लोक रावेर लोकसभेसाठी आज 4 रोजी मत मोजणीला प्रारंभ झाला आहे. प्रवेशापासून तर मीडिया कक्षा पर्यंत ऑनलाईन स्क्रीन अपडेट लावण्यात आला आहे. तर पत्रकारांना मीडिया कक्षा पर्यंत प्रवेश देण्यात आलेला आहे. मीडिया कक्ष ते मतमोजणी यामध्ये प्रतिनिधींना शूट करणे फक्त कॅमेऱ्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे. मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ आज मंगळवार (दि.४) रोजी प्रारंभ झाला आहे. सर्वप्रथम सकाळी साडेसात वाजता टपाली मतमोजणीला प्रारंभ झाला होता. मतमोजणी कक्षामध्ये जाण्याची परवानगी मागितली असता फक्त फोटो कॅमेरा व व्हिडिओ कॅमेरा असल्यास परवानगी देण्यात येत आहे. अन्यथा मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
आकडेवारीची मागणी केली असता सध्या तरी कोणीच कोणाला उत्तर मिळत नाही. मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणाहून आकडेवारी आल्यानंतरच मीडिया कक्षामध्ये आकडेवारी मिळणार आहे.
जळगाव लोकसभेमध्ये करण पाटील 11720 तर स्मिता वाघ 23032 आघाडी घेत पुढे आहेत.
तर रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे 12346 आघाडी घेत श्रीराम पाटील 9070 यांना मागे टाकत आहेत.