उन्हाळ्यात थंड दुधाचे सेवन ठरते लाभदायक

नवी दिल्ली : सामान्यतः अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करून, तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आपल्या डाएटमध्ये सहभागी करतात; पण तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळ्यामध्ये गरम दुधापेक्षा थंड दूध अतिशय फायदेशीर असते. जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल किंवा रक्तदाबाने तुमच्या समस्या वाढवल्या असतील, तर तुम्ही फ्रिजमधून एक ग्लास दूध नक्कीच पिऊ शकतात. …

उन्हाळ्यात थंड दुधाचे सेवन ठरते लाभदायक

नवी दिल्ली : सामान्यतः अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करून, तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आपल्या डाएटमध्ये सहभागी करतात; पण तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळ्यामध्ये गरम दुधापेक्षा थंड दूध अतिशय फायदेशीर असते. जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल किंवा रक्तदाबाने तुमच्या समस्या वाढवल्या असतील, तर तुम्ही फ्रिजमधून एक ग्लास दूध नक्कीच पिऊ शकतात. दुधाला संपूर्ण आहार मानला जातो. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटिन, पोटॅशियम, फॉस्फरससारखी पोषकतत्त्वे असतात. जी शरीरातील हाडे मजबूत करतात.
थंड दूध पिल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात याची तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती…
अ‍ॅसिडिटीपासून आराम – जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडिटी होत असेल, तर तुम्ही नक्कीच थंड दुधाचे सेवन करावे. थंड दूध पोटाला नियंत्रित ठेवते. तसेच दुधामध्ये असलेले कॅल्शियम एक्स्ट्रा अ‍ॅसिडला अवशोषित करून अ‍ॅसिड निर्माण होण्यापासून थांबवते.
मानसिक तणाव दूर ठेवते – थंड दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 12 चे चांगले प्रमाण रक्ताला पोषित करून ऊर्जा प्रदान करतात. थंड दूध घेतल्यास मानसिक तणाव दूर होतो.
वजन कमी होते – जर तुम्हाला वजन कमी करायचे असले, तर थंड दूध नक्कीच प्यावे. कारण, थंड दूध पिल्याने मेटॅबोलिजम बूस्ट होते. तसेच अनावश्यक कॅलरीज कमी होतात व खूप वेळपर्यंत पोट भरलेले जाणवते. ज्यामुळे व्यक्तीला भूक लागत नाही व वजन कमी करण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते – उच्च रक्तदाबासाठी थंड दूध खूप फायदेशीर असते. थंड दूध पिल्याने रक्तसंचार चांगल्या प्रमाणात होतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, उच्च रक्तदाबला नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेला मिळतो ओलावा (हायड्रेशन) – थंड दूध पिल्याने त्वचेला हायड्रेशन मिळते. ज्यामुळे त्वचा उजळते आणि आरोग्यदायी राहते. थंड दुधामध्ये व्हिटॅमिन ‘अ’चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. जे त्वचेचे रक्षण करते.