आंबवलेले पदार्थ आठवड्यातून किती वेळा खावेत?

नवी दिल्ली : आंबवलेल्या पदार्थांमधून शरीराला ‘प्रोबायोटिक्स’ म्हणजेच पोटातील लाभदायक जीवाणू मिळत असतात. जपानसारख्या देशात नाश्त्यामध्ये आंबवलेल्या सोयाबिन्सचा ‘नाट्टो’ हा पदार्थ हटकून असतोच. जपानी लोकांच्या दीर्घायुष्यामागे या पदार्थाचे योगदान मोठे असल्याचेही म्हटले जाते. आपल्याकडे इडली, डोसा असे अनेक पदार्थ आंबवलेल्या पिठापासून बनवलेले असतात. हे पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असले, तरी आपण ते नियमित खाऊ शकत …

आंबवलेले पदार्थ आठवड्यातून किती वेळा खावेत?

नवी दिल्ली : आंबवलेल्या पदार्थांमधून शरीराला ‘प्रोबायोटिक्स’ म्हणजेच पोटातील लाभदायक जीवाणू मिळत असतात. जपानसारख्या देशात नाश्त्यामध्ये आंबवलेल्या सोयाबिन्सचा ‘नाट्टो’ हा पदार्थ हटकून असतोच. जपानी लोकांच्या दीर्घायुष्यामागे या पदार्थाचे योगदान मोठे असल्याचेही म्हटले जाते. आपल्याकडे इडली, डोसा असे अनेक पदार्थ आंबवलेल्या पिठापासून बनवलेले असतात. हे पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असले, तरी आपण ते नियमित खाऊ शकत नाही. आंबवलेले पदार्थ जरी संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरीही त्यांच्या अतिसेवनामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आठवड्यातून मर्यादित प्रमाणात म्हणजे एक किंवा दोनवेळा असे पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
काही आंबवलेल्या पदार्थांमध्ये अतिप्रमाणात मीठ आणि साखर असते; ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होणे, पोट जड वाटणे किंवा अतिसारसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यीस्टच्या मदतीने पदार्थ आंबवला जात असल्यामुळे पदार्थ घट्ट होतो; ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आंबवलेले पदार्थ पचायला हलके आणि नियमित खाण्यासाठी योग्य नसतात. डोसा आणि इडली हे दक्षिण भारतातील लोकप्रिय पदार्थ असले, तरी ते पदार्थ नियमित खाणे योग्य ठरत नाही. उडीदडाळ ही पौष्टिक मानली जाते; पण त्याचबरोबर ही डाळ पचायला जड, उष्ण आहे. ही डाळ शरीरातील ऊतींना प्रतिरोध करते. त्यामुळे त्वचेचे आजार, रक्तस्राव आणि जळजळ होत असताना हे पदार्थ खाऊ नयेत.
त्याशिवाय उडीदडाळ ही पित्त आणि कफ दोन्ही वाढवते. डोसा हा आरोग्यासाठी चांगला आहे आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे नाकारता येत नाही; पण तो पचायला हलका पदार्थ नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी डोसा आणि इडली कमी प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. शिवाय, इडली किंवा डोसा बाहेर खाण्याऐवजी घरीच बनवून खाणे योग्य ठरते. दुकानात मिळणारे इडली आणि डोशाचे पीठ चांगले नसते. त्यात जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्हज्, मीठ किंवा साखर असते; ज्यामुळे पदार्थ खराब न होता, जास्त काळ आंबवले जातात. असे पदार्थ आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खावेत.