एक्झिट पोलमुळे सेन्सेक्समध्ये विक्रमी वाढ; सेन्सेक्स 76,738; निफ्टी 23,338 ने वाढले
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजाराने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला. एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याच्या निष्कर्षामुळे शेअर बाजाराने ही उसळी घेतली. सेन्सेक्सने 76,738 आणि निफ्टीने 23,338 चा उच्चांक गाठला. सध्या सेन्सेक्स 2000 हून अधिक अंकांच्या वाढीसह 76,050 च्या पातळीवर आहे. निफ्टीत 650 हून अधिक अंकांची वाढ झाली आहे. निफ्टीने 23,200 ची पातळी गाठली आहे.
शेअर बाजारात चालू वर्षातील लाभाचा हा सर्वात मोठा पल्ला आहे. यापूर्वी 29 जानेवारी रोजी सेन्सेक्स 972 (1.76 टक्के) अंकांनी वधारला होता. अदानी पोर्टस्च्या शेअर्समध्ये सोमवारी 8 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया 42 पैशांनी मजबूत झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 83 रुपये प्रति डॉलर होता. सोमवारी तो 83.42 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला आहे.