Lok Sabha Election 2024 Live : मतमोजणीला सुरुवात; राज्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि. ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाने मतमोजणीला प्रारंभ होईल. सकाळी साडे आठ वाजल्यापासून इव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल समोर येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी केंद्रावर सुरुवातीला पोस्टाद्वारे आलेल्या मतदानाची मोजणी होणार आहे. राज्यातील सुमारे २ लाख ५६ हजार ८९८ इतक्या पोस्टल मतांची ही मोजणी होणार आहे. त्यानंतर ९८ हजार १४० मतदान केंद्रावरील १ लाख ९७ हजार ४५ बॅलेट युनिट आणि ९८ हजार १४० कंट्रोल युनिट तसेच ९८ हजार १४० व्हीव्हीपॅट असलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी करण्यात येईल.
इव्हीएम आणि टपाली मतपत्रिका मोजणीनंतर व्हीव्हीपॅट मोजणार
टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम आणि टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे.
Lok Sabha Election 2024 Live –
* उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोर कीर्तिकर आघाडीवर
*बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर
*नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर
*कोल्हापुरातून शाहू छत्रपती महाराज आघाडीवर
*नागपुरात पोस्टल बॅलेटच्या पेट्या उघडल्या
अशी होईल मतमोजणी –
सकाळी ८.३० वा- इव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ
सकाळी ८.१५ वा- स्ट्राँगरूममधून मतदान केंद्र निहाय इव्हीएम मतमोजणी टेबलवर
सकाळी ८ वा- टपाली मतदान मोजणीला प्रारंभ
सकाळी ७.३० वा- मतमोजणी कर्मचारी नियुक्त टेबलवर बसतील
सकाळी ७ वा- मतमोजणी कर्मचार्यांचे रॅन्डमायझेशन
सकाळी ७ वा- स्ट्राँग रूम उघडले जातील
सकाळी ६ वा : मतमोजणी कर्मचारी, अधिकारी उपस्थिती नोंद