सोलापूर : बोरामणीजवळ कार-कंटेनर अपघातात बाप-लेक ठार ; दोघे जखमी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : बोरामणीजवळील चिरका तांडा येथे समोरून जाणार्‍या कंटेनरला पाठीमागून कारची जोरची धडक बसल्याने पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले.हा अपघात सोमवारी (दि.३) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडला. वीरेंद्र संजय कारंजे (वय 27) व संजय शांतप्पा कारंजे (वय 55, दोघे रा. नातेपुते, ता. माळशिरस) अशी मृतांची नावे आहेत. तर वैभव संजय कारंजे …

सोलापूर : बोरामणीजवळ कार-कंटेनर अपघातात बाप-लेक ठार ; दोघे जखमी

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : बोरामणीजवळील चिरका तांडा येथे समोरून जाणार्‍या कंटेनरला पाठीमागून कारची जोरची धडक बसल्याने पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले.हा अपघात सोमवारी (दि.३) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडला. वीरेंद्र संजय कारंजे (वय 27) व संजय शांतप्पा कारंजे (वय 55, दोघे रा. नातेपुते, ता. माळशिरस) अशी मृतांची नावे आहेत. तर वैभव संजय कारंजे (वय 24, रा. नातेपुते) व सुमन लक्ष्मण लिगाडे (वय 60, रा. बाळे, सोलापूर) हे दोघे जखमी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, वीरेंद्र कारंजे, संजय कारंजे, वैभव कारंजे व सुमन लिगाडे हे चौघेजण (एमएच 12 सीडी 2481) कारमधून हैदराबाद रस्त्यावरून सोलापूरच्या दिशेने येत होते. बोरामणीजवळील चिरका तांडा येथे समोर जाणार्‍या कंटेनर (टीएस 08 यूजे 5428) ला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले तर जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींवर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. याबाबत रोहित राजेंद्र कनोजिया (वय 24, जोनपूर खुर्द, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक इज्जपवार हे करीत आहेत.
हेही वाचा :

कोल्‍हापूर : सायबर चौकात भरधाव कारने 7 जणांना उडवले; 3 ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती
बीड: बेलगाव फाट्याजवळ गाडीची झाडाला धडक; २ जण जखमी
परभणी: हादगाव येथे दुचाकी-कारची धडक; एक ठार, अपघातग्रस्त कार पेटवली