यवतमाळ : हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : बाभूळगावमध्ये अनेक महिन्यांपासुन सुरू असलेल्या ‘हायप्रोफाइल’ आंतरजिल्हा जुगार अड्ड्याचा एलसीबीने पर्दाफाश केला आहे. एलसीबी पथकाने शनिवारी(दि.१) रात्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून अड्डाचालकासह यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील २८ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच सव्वा नऊ लाखांची रोख, २६ मोबाइल, चार चारचाकी वाहने असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुरुषोत्तम विठूमल सरडेचा (वय …

यवतमाळ : हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : बाभूळगावमध्ये अनेक महिन्यांपासुन सुरू असलेल्या ‘हायप्रोफाइल’ आंतरजिल्हा जुगार अड्ड्याचा एलसीबीने पर्दाफाश केला आहे. एलसीबी पथकाने शनिवारी(दि.१) रात्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून अड्डाचालकासह यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील २८ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच सव्वा नऊ लाखांची रोख, २६ मोबाइल, चार चारचाकी वाहने असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पुरुषोत्तम विठूमल सरडेचा (वय ७३, रा. अमरावती) हर्षल रमेश भुजात्रे (वय २५, रा. तळेगाव, ता. आष्टी) हिमांशू ऊर्फ मोनु विरेंद्र बढाये (वय २२, रा. करळगाव) प्रवीण बाबाराव उईके (वय ४३, रा. भांबराजा) फैयाज शहा हाफीज शहा (वय ३४, रा. अशोकनगर, अकोला) मोहम्मद शहेबाज शेख मेहमूद पटेल (वय ४६, रा. कुऱ्हा, ता. तिवसा) राम जेठामल मोटवानी (वय ५२, रा. कुऱ्हा रोड, चांदुर रेल्वे ) ललकारसिंग बिजरसिंग टाक (वय २५, तळेगाव, ता. आष्टी) रहीम खान हुसेन खान (वय ५०, रा. अकोला) इम्रान खान शमा खान (वय ३३, रा. अकोला) इम्रान खान शौकत खान (वय २५, रा. अकोला) मोहम्मद इम्रान मोहम्मद जाफर (वय ४३, रा. यवतमाळ) जावेद शहा हुसेन शहा (वय २१, रा. अकोला) मुजाहीद शहा शब्बीर शहा (वय ३२, रा. अकोला) हाफीज खान खैरुउल्ला खान पठाण (वय३५, रा. आलेगाव) शेख अस्लम शेख सुभान (वय ३०, रा. यवतमाळ) जगत गोपालदास मोटवानी (वय ४५, रा. चांदुररेल्वे) उमेश मुधकर इंगळे (वय ४३, रा. चांदुररेल्वे) शेख इम्रान शेख लुकमान (वय ३५, रा. यवतमाळ) सलमान खान बाबा खान पठाण (वय ३२, रा. बाभूळगाव) जानन तुकाराम राठोड (वय ४२, रा. पिंप्री) अफसर पठाण (वय ३८, रा. चांदुररेल्वे) योगेश अरुण केणे (वय ३३, रा. चांदुररेल्वे) नयन विनायक चिव्हाणे (वय ३४, रा. यवतमाळ) सचिन घनशामदास लोया (वय ४५, रा. चांदुररेल्वे) शेख फिरोज शेख सुलतान (वय ३३, रा. यवतमाळ) सूरज किशोर सावरन (वय ३५, रा. अकोला) व अड्डाचालक सचिन प्रभाकर वाघमारे (वय ३६, रा. बाभूळगाव) अशी जुगाऱ्यांची नावे आहेत.
एलसीबीचे पथक बाभूळगावमध्ये पेट्रोलिंग करीत होते. यावेळी बसस्थानक ते बाभूळगाव रोडवरील महालक्ष्मी हार्डवेअरच्या मागे राहणारा सचिन वाघमारे हा त्याच्या राहत्या घरी जुगारीचा डाव मांडत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचला. त्यानंतर पथकाने घराला घेराव घालून जुगारावर धाड टाकली. यावेळी आरोपींकडून डावावरील ९ लाख २६ हजार रुपये रोख, दोन लाख ५५ हजारांचे २६ मोबाइल, ४०० रुपयांचे चार कॅट, २१ लाख ५० हजारांच्या चार कार असा एकूण ३३ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. त्यानंतर अड्डाचालकासह जुगार खेळणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.