निकालापूर्वीच नितीश कुमार मोदींना भेटले, केंद्रात मंत्रीपदाची चर्चा
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे निकालापूर्वीच राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात मंत्रीपद स्वीकारावे, अशी मोदी यांची इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नितीश कुमार केंद्रात मंत्री झाल्यास त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून जदयु पक्षातील दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाणार आहे. त्याबाबत मोदी आणि नितीश कुमार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिहारमध्ये भाजपला ओबीसी मतदारांवर पकड निर्माण करायची आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी असल्यास भाजपला हे शक्य होणार नाही. त्यामुळे नितीश कुमार यांना केंद्रात घेऊन बिहारमध्ये आपली ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
लोकसभा निवडणूक २०२४ : अखेरच्या टप्प्यात मताधिकाराचा उत्साह; सकाळी ९ पर्यंत ११.३ % मतदान
Nashik | पोलीस व उद्योजक यांच्यातील संवाद प्रक्रिया वाढविण्यावर भर : आयुक्त संदीप कर्णिक
Lok Sabha Election Result : भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी, बुंदीचे लाडूही वळून तयार