परभणी: ७ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचे उपअधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मनपा हद्दीतील एका प्लॉटच्या खरेदीनंतर नवीन मिळकतीच्या पीआर कार्डसाठी तडजोडीअंती 7 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.3) करण्यात आली आहे. दत्तू सोनवणे (रा. माऊली निवास, अष्टविनायकनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक, सध्या रा. लोकमान्य नगर, परभणी) असे लाच स्विकारलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. …

परभणी: ७ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचे उपअधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

परभणी, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील मनपा हद्दीतील एका प्लॉटच्या खरेदीनंतर नवीन मिळकतीच्या पीआर कार्डसाठी तडजोडीअंती 7 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.3) करण्यात आली आहे.
दत्तू सोनवणे (रा. माऊली निवास, अष्टविनायकनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक, सध्या रा. लोकमान्य नगर, परभणी) असे लाच स्विकारलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी 2004 मध्ये महानगरपालिका हद्दीतील सर्व्हे क्रमांक 303 मध्ये प्लॉट खरेदी केला आहे. त्यांच्या प्लॉटचे नवीन मिळकत क्रमांक देऊन पीआर कार्ड बनवून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागाने आदेश दिले आहेत. या आदेशानुसार नवीन मिळकत क्रमांक व पीआर. कार्ड मिळण्यासाठी तक्रारदारांनी भूमी अभिलेखच्या उप अधीक्षक कार्यालयात दि. 29 नोव्हेंबर रोजी अर्ज दिला होता. या अर्जावरून काम झाले का नाही, याबाबत तक्रारदारांनी वेळोवेळी उपअधीक्षक सोनवणे यांच्याकडे विचारणा केली.
परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. यातच दि.7 मे रोजी तक्रारदारांनी सोनवणे यांची भेट घेत प्रलंबित कामाबाबत विचारणा केली असता सोनवणे यांनी त्यांना 10 हजारांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदारांनी दि.27 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली.
त्यानंतर तक्रारदारांकडून ही लाच स्वीकारल्यानंतर दत्तू सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई नांदेडचे एसीबीचे अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, परभणीचे उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक बसवेश्‍वर जकीकोरे व त्यांच्या टीमने केली.
हेही वाचा 

परभणी: हादगाव येथे दुचाकी-कारची धडक; एक ठार, अपघातग्रस्त कार पेटवली
परभणी : पिंपळभत्या येथे दुचाकींची धडक; ३ तरुण गंभीर जखमी
परभणी: गौर येथे कर्जास कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपविले