सांगली : प्रा. सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल
मिरज; पुढारी वृत्तसेवा : येथील काँग्रेस नेते प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे निश्चितच राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
मिरज मतदारसंघ आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सोडला जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने प्रा. जाधव यांनी मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.
जाधव यांनी पंधरा वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले. यापूर्वी 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली. त्यावेळी दुसर्या क्रमांकाची मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार तथा विद्यमान मंत्री सुरेश खाडे यांच्याशी अटीतटीची लढत दिली होती. काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कर्नाटक राज्याचे पक्ष निरीक्षक म्हणूनही काँग्रेसकडून त्यांना संधी देण्यात आली होती.
मिरज विधानसभेसाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होत होती. त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकावर असायचे. मात्र आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी समवेत असल्यामुळे मिरज मतदारसंघाची लढत अटीतटीची होणार आहे. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे येणार असल्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात थेट लढतीची शक्यता आहे. यावेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अविनाश पाटील उपस्थित होते.
The post सांगली : प्रा. सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल appeared first on पुढारी.
मिरज; पुढारी वृत्तसेवा : येथील काँग्रेस नेते प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे निश्चितच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मिरज मतदारसंघ आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सोडला जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने प्रा. जाधव यांनी मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा हाती घेतला …
The post सांगली : प्रा. सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल appeared first on पुढारी.