नताशाने हार्दिक पांड्यासोबतचे सर्व फोटो केले रि-स्टोर, भांडण संपुष्टात?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची त्नी, अभिनेत्री नताशामध्ये बिनसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चाही रंगली. तसेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने हार्दिक पांड्यासोबतचे फोटो हटवल्याचेही दिसले. आता सोशल मीडियावर पुन्हा या कपलचे फोटो पाहायला मिळत आहेत.
अधिक वाचा –
sanvikaa : ‘पंचायत ३’ मध्ये सिंपल दिसणारी रिंकी खऱ्या आयुष्यात हॉट
सोशल मीडियावर नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाचे वृत्त पसरले. पण, दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही. पण, त्यांच्या मौनाने दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज लावला जात होता. दरम्यान, नताशा सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक अपडेट्स शेअर करते. आता नताशाने आपल्या इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या सोबतचे लग्न आणि व्हॅलेंटाईनसहित अनेक फोटोज रि-स्टोर केले आहेत.
अधिक वाचा –
विद्यार्थ्यांची धमाल मस्ती पाहायला मिळणार ‘बंटी बंडलबाज’ चित्रपटात
नताशाने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर हार्दिकसोबतचे सर्व फोटो रि-स्टोर केल्याचे दिसते. यामध्ये व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नातील सुंदर फोटोंचा समावेश आहे. फोटोज अचानक गायब होणं आणि पुन्हा रि-स्टोर करण्यामागील खरे कारण अद्याप समजलेले नाही.
अधिक वाचा –
Heeramandi 2 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या तवायफची कहाणी! ‘नेटफ्लिक्स’ची घोषणा
View this post on Instagram
A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)