सांगोला-पंढरपूर रोडवर दुचाकीला कारची धडक; ३ जण ठार
सांगोला : Bharat Live News Media वृत्तसेवा सांगोला-पंढरपूर रोडवर मांजरी व बामणी गावाजवळ मोटरसायकलला कारने जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल. यामध्ये महाळाप्पा महादेव धनगर (वय २२ वर्षे) रा पट्टणकोडोली ता. निपाणी, विठ्ठल बिरा दिवटे (वय १९) रा. गायकवाडवाडी ता. निपाणी, बिराप्पा नवलप्पा कोळेकर (वय.१९) रा. कोणणुळी ता. निपाणी यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अधिक माहिती अशी की, रविवार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगोला-पंढरपूर रोडवर बामणी व मांजरी ओढयाच्या पुलाजवळ चारचाकी गाडी नं एम .एच . ४२ एच ७९९३ ने मोटरसायक एच एफ डिलक्स गाडी नंबर के ए . २३ ई डब्लू ७०१६ ला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील महाळाप्पा महादेव धनगर (वय २२ वर्षे) रा पट्टणकोडोली ता. निपाणी विठ्ठल बिरा दिवटे (वय १९) रा. गायकवाडवाडी ता. निपाणी बिराप्पा नवलप्पा कोळेकर (१९) रा. कोणणुळी ता. निपाणी हे जागीच ठार झाले. हे तिघे तनाळी ता. पंढरपूर येथून शिरढोण येथे देवाला चालले होते. हे तिघेही मेंढपाळा आहेत. या अपघाताची फिर्याद बिरू महादेव धनगर यांनी दिली असून, सांगोला पोलीस ठाण्यात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
कोकण पदवीधर निवडणूक: काँग्रेसकडून रमेश किर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Southwest Monsoon | मान्सूनची वेगाने वाटचाल दक्षिणेतील ‘या’ राज्यात दाखल
मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून जीवन संपविले