भारतीय मतदारांनी केला जागतिक विक्रम : मुख्य निवडणूक आयुक्त
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या (४ जून) जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत 31 कोटी 20 लाख महिलांसह 64 कोटी 20 मतदारांच्या सहभागाने जागतिक विक्रम केला आहे. ही आकडेवारी जी-7 देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि २७ युरोपियन युनियन देशांमधील मतदारांच्या 2.5 पट आहे.”
यावेळी राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांच्या सहभागाने भारताने जागतिक विक्रम केला.जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 68,000 पेक्षा जास्त देखरेख टीम, 1.5 कोटी मतदान केंद्र आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीसाठी सुमारे चार लाख वाहने, 135 विशेष गाड्या आणि 1,692 हवाई उड्डाणे वापरली गेली.
#WATCH | Delhi | Election Commission of India gives a standing ovation to all voters who took part in Lok Sabha elections 2024 pic.twitter.com/iwIfNd58LV
— ANI (@ANI) June 3, 2024
फक्त ३९ ठिकाणी घ्यावे लागले फेरमतदान
२०१९ लोकसभा निवडणुकीत देभरात ५४० ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. मात्र यंदा केवळ ३९ ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागले. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये चार दशकांतील सर्वाधिक एकूण 58.58 टक्के मतदान झाल्याचेही त्यांनी सांगितले.
Press Conference by Election Commission of India https://t.co/UjtUdjvJ9b
— Election Commission of India (@ECISVEEP) June 3, 2024
लोक सभा 2024 के चुनाव almost violence फ्री रहे और peaceful तरीके से संपन्न हुए.
Whether its LWE Areas, Manipur, J&K, Tripura, or West Bengal, we have acted swiftly and taken tough measures for peaceful elections- EC#GeneralElections2024 #ChunavKaParv pic.twitter.com/93D0jUnu09
— Election Commission of India (@ECISVEEP) June 3, 2024
Electoral Search: Commission has leveraged technology to facilitate voters at every step. 620 million searches have been requested on ECI Search Portals on poll day which retrieves information about voters’ polling booths & names on the electoral rolls.#GeneralElections2024 pic.twitter.com/pVX4sXRNae
— Election Commission of India (@ECISVEEP) June 3, 2024
सुमारे १० हजार कोटी रुपयांची रोकड जप्त
“निवडणूक आयोगाने या निवडणुकीदरम्यान सुमारे 10,000 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. हाही एक विक्रम आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये जप्त केलेल्या मूल्याच्या सुमारे 3 पट असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.