सामनगावच्या ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो; ढोरा खोलीकरण बंद पाडल्याने अस्वस्थता

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्यानंतर सामनगाव येथील ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव घेतली. कासार पिंपळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांनी, ‘आम्हास पाण्यासाठी न्याय द्या,’ म्हणत टाहो फोडला. कायम दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईशी दोन हात करणार्‍या महिलांना यावेळी अक्षरशः अश्रू अनावर झाले. ‘आम्हाला …

सामनगावच्या ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो; ढोरा खोलीकरण बंद पाडल्याने अस्वस्थता

शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्यानंतर सामनगाव येथील ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव घेतली. कासार पिंपळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांनी, ‘आम्हास पाण्यासाठी न्याय द्या,’ म्हणत टाहो फोडला. कायम दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईशी दोन हात करणार्‍या महिलांना यावेळी अक्षरशः अश्रू अनावर झाले.
‘आम्हाला न्याय द्या!’
सामनगाव येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ढोरा नदी व बंधारा खोलीकरणाचे हाती घेतले. काम अंतिम टप्प्यात असताना स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहानिशा न करता महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिजाचे कारण पुढे करत हे काम बंद पाडले. त्यामुळे जलसमृद्धीकडे सुरू असलेली गावची वाटचाल थांबवल्याचा आरोप करत महिला व ग्रामस्थांनी आमदार राजळे यांची भेट घेतली. आता तुम्हीच आमच्या मायबाप आहात, आम्हाला न्याय द्या.
राजकीय द्वेषतून कारवाई?
ग्रामसभेने रीतसर ठराव व परवाने घेऊन, सर्व रेकॉर्ड पारदर्शी ठेवलेले असताना केवळ राजकीय द्वेषातून केलेली कारवाई अन्यायकारक आहे. पावसाळा तोंडावर आहे, काम पूर्णत्वास जात असताना महसूल प्रशासनाने पाण्याच्या शाश्वत स्रोेताच्या उपलब्धतेसाठी लढणार्‍या गावांना अशा पद्धतीने नाऊमेद करणे चुकीचे आहे, असा आक्रोश ग्रामस्थांनी केला.
आ.राजळे यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांना तातडीने बोलावून घेत लगेचच प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व सकारात्मक निर्णय घेण्याचा आदेश दिला. या वेळी उमेश भालसिंग, संदीप सातपुते, भगवान कापरे, शिवाजी भिसे, भीमराज सागडे, मधुकर वावरे, सरपंच आदिनाथ कापरे, उपसरपंच संगीता नजन, सुनीता नजन, कानिफ म्हस्के, भागवत लव्हाट, बाबासाहेब गाडगे, राजेंद्र जमधडे, सुधीर म्हस्के, गणेश म्हस्के, भारत म्हस्के, दत्तात्रय दातीर, राजेंद्र जमधडे, झुंबरबाई दहीफळे, मीरा फाटके, द्वारका कापरे, सुनीता कापरे, लताबाई मिसाळ आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या लोकभावनेचा आदर करून संबंधित विषयाबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू.
– आमदार मोनिका राजळे

हेही वाचा 

Nashik Fake Notes Case | त्या महिलांनी बनावट नोटा कोठून आणल्या, कोठे छापल्या? तपास अंधातरीच
पनवेल केस : सलमान खान हल्ला कटप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
जिल्ह्यातील 223 पूरप्रवण गावांवर वॉच; खबरदारी म्हणून 500 जणांना प्रशिक्षण; 7 बोटींची व्यवस्था