पदपथावरील डीपीमुळे पादचार्यांची गैरसोय; मगरपट्टा रस्त्यावरील समस्या
हडपसर : मुंढवा-मगरपट्टा रस्त्यावरील पदपाथ अरुंद असून, त्यावर विजेचा डीपी आहे. यामुळे पादचार्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच पावसाळ्यात या डीपीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पदपथावरील हा डीपी इतर ठिकाणी हलविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मगरपट्टा-मुंढवा हा मार्ग अगोदरच अरुंद आहे. या मार्गावरून मगरपट्टा सिटी, अमनोरा सिटी, मुंढवा आणि चंदननगरकडे जाणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. या रस्त्यावरील पदपथावर महावितरण कंपनीने डीपीसाठी बॉक्स बसवला आहे. तसेच या ठिकाणी पदपथ खचल्याने खड्डाही पडला आहे. या रसत्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, डीपी बॉक्समुळे पादचार्यांना पदपथावरून चालता येत नाही. अनेकजण पदपथावरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे हा पदपथ धोकादायक झाला आहे. प्रशासनाने पदपथावरील डीपी इतर ठिकाणी हलवावा आणि या ठिकाणी पडलेला खड्डा बुजवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा
पनवेल केस : सलमान खान हल्ला कटप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
पोलिसाच्या दुचाकीवरून उडी मारून गोट्या पळाला!
गृहनिर्माण संंस्थांचे 601 ’डीम्ड कन्व्हेयन्स’ पूर्ण; जिल्हा उपनिबंधकांची माहिती