वर्तमानपत्र वाचनाची सवय लावल्यास भविष्य उज्वल – प्रांताधिकारी
भुसावळ : Bharat Live News Media वृत्तसेवा – “मोबाईल टाळून रोज वर्तमानपत्र वाचनाची सवय लावल्यास भविष्य उज्वल होणार” असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले. ते होमगार्ड पथकातील दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.
भुसावळ तालुका होमगार्ड पथकातील पाल्य बारावी व दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने अशा यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी चा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि.२) रोजी सकाळी ९.०० वाजता पंचायत समिती सभागृहात येथे कार्यक्रम पार पडला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक सिंग गुरुंग आणि किरणसिंग राजपूत यांनी परिश्रम घेतले. पथकातील वरीष्ठ होमगार्ड अधिकारी यांची पदोन्नती झालेली असल्याने त्यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. पदोन्नती- कंपनी कमांडर प्रभारी तालुका समादेशक अधिकारी नरवीरसिंह रावळ, कंपनी कमांडर सुरेख इंगळे, वरीष्ठ पलटण नायक दारासिंग पाटील, विद्या लोखंडे, रेखा सावळे बी. एस. एम., दीपकसिंग गुरुंग यांना देखील सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी तालुका समादेशक अधिकारी मधुकर गोडबोले आणि अनिल बोराडे उपस्थित होते. तसेच भुसावळ तालुका होमगार्ड्स पथक तर्फे आपत्ती व्यवस्थापन कामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू टीम बचाव कार्य, 25 होमगार्ड्स जवान पथक आणि आपदा मित्र टीम तयार करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
Nashik Fake Notes Case | बनावट नोटांचा तपास अंधातरी, पथकप्रमुखही अनभिज्ञ?
Delhi-Mumbai Akasa Air flight | पुन्हा ‘बॉम्ब’ची धमकी, ‘आकासा’ने विमान अहमदाबादकडे वळवले