वयाच्या ९३ वर्षी रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा बोहल्यावर
Bharat Live News Media ऑनलाईन ; अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी पुन्हा एकादा लग्न केले आहे. हे त्यांचे तब्बल पाचवे लग्न आहे. कॅलिफोर्निया येथील आपल्या फार्महाउसवर त्यांनी ६७ वर्षीय गर्लफ्रेन्ड एलेना झुकोवा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, झुकोवा निवृत्त जीवशास्त्रज्ञ आहेत. त्या रशियातून अमेरिकेत आल्या आणि तिथेच स्थायिक झाल्या. मरडॉक यांनी मार्च २०२३ मध्ये लेस्ली स्मिथला प्रपोज केले होते, त्यांनी साखरपूडाही केला हाेता पण दोन आठवड्यांनंतर ते वेगळे झाले होते. यानंतर मर्डोक यांनी लगेचच एलेनाशी डेट करायला सुरू केले.
रुपर्ट मर्डोक यांच्या विषयी :
रुपर्ट मर्डोक यांचे ९३ व्या वर्षी पाचवे लग्न
६७ वर्षीय गर्लफ्रेन्ड एलेना झुकोवा यांच्याशी लग्नगाठ
कॅलिफोर्नियातील फार्महाउसवर साेहळा पार पडला
मर्डोक यांची चार लग्ने अन् घटस्फाेट
सहा मुलांचे वडील मर्डोक यांचे पूर्वी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकरशी लग्न झाले होते, त्यांच्याशी त्यांनी 1960 च्या शेवटी घटस्फोट घेतला होता. यानंतर त्यांचे दुसरे लग्न वृत्तपत्रातील पत्रकार असलेल्या अण्णा तोरव यांच्याशी झाले. दोघेही जवळपास 30 वर्षे एकत्र राहिले आणि 1999 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर मर्डोक यांनी वेंडी डेंगशी तिसरे लग्न केले आणि 2013 मध्ये घटस्फोट घेतला. मर्डॉक यांनी पुन्हा एकदा म्हणजे चौथे लग्न केले. त्यांनी मॉडेल जेरी हॉलशी चौथ्यांदा विवाह केला. ती रोलिंग स्टोन्स फ्रंटमॅन मिक जॅगर सोबत बरेच दिवस एकत्र राहिली होती.
रूपर्ट मर्डोक कोण आहेत?
१९३१ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मर्डोक यांचा जन्म झाला. अनेक दशके ते फॉक्स कॉर्पोरेशन आणि न्यूज कॉर्पचे प्रमुख राहिले. मोठ्या अरबपतींमध्ये त्यांची गणना होते. १९६९ मध्ये न्यूज ऑफ द वर्ल्ड आणि सन वृत्तपत्राची मालकी घेतल्यानंतर मर्डोक यांचे माध्यम जगतात मोठे नाव होत गेले. त्यांनी आपल्या उद्योगाचा वेगाने विस्तार केला. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटेन मधील अनेक टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांचे ते मालक आहेत. ज्यामध्ये द वॉल स्ट्री जर्नल, फॉक्स न्यूज सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
हेही वाचा :
Monsoon Update: राज्यात मान्सून ८ जूनला येणार
Weather forecast: पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यात मान्सूनपूर्वचा अंदाज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहाजी बापूंची रूग्णालयात घेतली भेट