पुन्हा ‘बॉम्ब’ची धमकी, ‘आकासा’ने विमान अहमदाबादकडे वळवले

पुढारी ऑनलाईन डेस्क: विमानात बाॅम्‍ब असल्‍याची धमकी मिळाल्‍याने दिल्ली-मुंबई आकासा विमान सोमवारी (दि.३ जून) सकाळी ऑनबोर्ड सुरक्षा सतर्कतेमुळे अहमदाबादकडे वळवण्यात आले. या विमानामध्ये सहा क्रू यांच्यासह तब्बल १८६ प्रवासी (Delhi-Mumbai Akasa Air flight ) होते. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. आज सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी विमान …
पुन्हा ‘बॉम्ब’ची धमकी, ‘आकासा’ने विमान अहमदाबादकडे वळवले


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: विमानात बाॅम्‍ब असल्‍याची धमकी मिळाल्‍याने दिल्ली-मुंबई आकासा विमान सोमवारी (दि.३ जून) सकाळी ऑनबोर्ड सुरक्षा सतर्कतेमुळे अहमदाबादकडे वळवण्यात आले. या विमानामध्ये सहा क्रू यांच्यासह तब्बल १८६ प्रवासी (Delhi-Mumbai Akasa Air flight ) होते. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. आज सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी विमान अहमदाबादला वळवले. पुढे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानतळावर बाहेर काढण्यात आले, अशी माहिती आकासा विमान (Delhi-Mumbai Akasa Air flight ) कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

Akasa Air spokesperson says, “Akasa Air flight QP 1719, flying from Delhi to Mumbai on June 03, 2024, and carrying 186 passengers, 1 infant and six crew members on board, received a security alert on board. As per prescribed safety and security procedures, the plane was diverted… pic.twitter.com/t6W6ITiTPk
— ANI (@ANI) June 3, 2024

यापूर्वी देखील मिळालेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे वेगवेगळ्या एअरलाइन्सच्या अनेक फ्लाइट्सने आपत्कालीन लँडिंग केले आहे. रविवारी (दि. २ जून) 306 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह मुंबईला जाणारे विस्तारा फ्लाइट अचानक उतरवण्यात आले. स्वच्छतागृहात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ही कारवाई (Delhi-Mumbai Akasa Air flight) करण्यात आली.
शनिवारी (दि.१ जून) संध्याकाळी अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये वाराणसी-दिल्ली इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी मिळाली. ज्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणांनी त्वरित कारवाई केली.
चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला आणखी एक बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर त्याचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले.

Go to Source