‘अमूल’ पाठोपाठ ‘मदर’ डेअरीच्याही दूध विक्री दरात वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात आजपासून (दि.३ जून) अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने देखील दूध विक्री दरात (Milk Prices) २ रुपयांनी वाढ केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. लोकसभा निवडणूक संपताच देशातील दोन मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. प्रथम अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे …
‘अमूल’ पाठोपाठ ‘मदर’ डेअरीच्याही दूध विक्री दरात वाढ


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: देशभरात आजपासून (दि.३ जून) अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने देखील दूध विक्री दरात (Milk Prices) २ रुपयांनी वाढ केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
लोकसभा निवडणूक संपताच देशातील दोन मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. प्रथम अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे विक्री दरात दोन रुपयांनी वाढ (Milk Prices) केली. अवघ्या 12 तासांनंतर मदर डेअरीनेही आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मदर डेअरीने 3 जूनपासून ताज्या पाऊच दुधाचे (सर्व प्रकारचे) दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवले ​​आहेत.

Mother Dairy has increased prices of fresh pouch milk (All variants) by Rs 2 per litre, effective from June 3: Mother Dairy pic.twitter.com/zUnftxsG7d
— ANI (@ANI) June 3, 2024

Milk Prices: दूध उत्पादन खर्चात वाढ झाल्याने विक्रितही वाढ
याआधी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) सांगितले होते की, दुधाचा एकूण खर्च आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता सोमवारपासून सर्व प्रकारच्या अमूल दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये अमूल दुधाच्या पाऊचच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ होणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारी २०२३  मध्ये दूध विक्री दरात वाढ
जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयन मेहता यांनी सांगितले की, अमूल ब्रँड अंतर्गत सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये GCNMF ने दुधाच्या दरात शेवटची वाढ केली होती. शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे मेहता यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:

अमूलच्या दूध विक्री दरात आजपासून २ रूपयांची वाढ

 

Go to Source