मालवणात नौदलाच्या थरारक कसरती

मालवण : भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडोकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. नौदलाच्या जवानांचा सराव पाहण्यासाठी तारकर्लीच्या किनारपट्टीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. … The post मालवणात नौदलाच्या थरारक कसरती appeared first on पुढारी.
#image_title

मालवणात नौदलाच्या थरारक कसरती

महेश कदम

मालवण : भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडोकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. नौदलाच्या जवानांचा सराव पाहण्यासाठी तारकर्लीच्या किनारपट्टीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. (Navy Day)
सराव प्रात्यक्षिकांच्या सुरुवातीला मरीन कमांडोनी विमानातून खाली उडी मारत पॅराशुटद्वारे जमिनीवर उतरण्याचे कसब दाखवले. यानंतर समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तसेच सैनिकांना वाचविण्यासाठी धनुष हेलिकॉप्टरचे आगमन झाले. या हेलिकॉप्टर मधून मदतीची वाट पाहणार्‍या मच्छीमार आणि सैनिकांना हवेतल्या हवेत एअरलिफ्ट करण्यात आले आणि त्यांना सुरक्षित स्थळी उतरविण्यात आले. त्यानंतर समुद्रात घात लावून पाण्यात लपून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी ए.एस.डब्ल्यू हेलिकॉप्टरने सोनार बॉडीला समुद्राच्या पाण्यात सोडत दुष्मनाची पाणबुडी शोेधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. (Navy Day)
मोठ्या धमाक्यासह दुश्मनांची चौकी उध्वस्त
नौदलाच्या आयएनएस कोलकाता,तलवार,ब्रह्मपुत्रा,सुभद्रा यांसह आयएनएस बेतवा आदी युद्धनौकांनी तारकर्लीच्या समुद्रात संचलन केले. यावेळी आयएनएस बेतवा वर सी किंग हेलिकॉप्टर यशस्वीपणे उतरविण्याचा यशस्वी डेमो करून दाखवण्यात आला.बुधवारच्या दिवसाचे आयएनएस खंडेरी आकर्षण ठरले. प्रात्यक्षिकांच्या अखेरीस भारतीय नौदलाच्या जवानांनी समुद्रात रबरी बोटीच्या सहाय्याने येत दुश्मनांची चौकीला बॉम्बच्या साह्याने उडून दिले. हा जबरदस्त धमाका पाहून नागरिक अचंबित झाले होते. ध्रुव, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टर बरोबर तेजस, डॉर्नियर, मिग 29 के आदी लढाऊ विमानांनी आपल्या कसरती दाखविल्या. सरते शेवटी सनसेट सेरेमनी संपन्न झाली.
हेही वाचा :

Combat Army Aviation Training School : काॅम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दीक्षांत सोहळा
टिपू सुलतानच्या फोटोला हार घालत प्रकाश आंबेडकरांच्या सभेला सुरुवात; नव्या वादाला फुटले तोंड
अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानेच झाला : अनिल देशमुख

The post मालवणात नौदलाच्या थरारक कसरती appeared first on पुढारी.

मालवण : भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडोकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. नौदलाच्या जवानांचा सराव पाहण्यासाठी तारकर्लीच्या किनारपट्टीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. …

The post मालवणात नौदलाच्या थरारक कसरती appeared first on पुढारी.

Go to Source