अंबानींना पिछाडीवर टाकत अदानी पुन्हा बनले श्रीमंत उद्योगपती
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांनी मुकेश अंबानी यांना पिछाडीवर टाकले आहे. अदानी यांना त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वधारल्याचा मोठा फायदा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती111 अब्ज डाॅलरवर पोहोचली असून, ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 109 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स वधारले
अमेरिकन ब्रोकरेज कंपनी जेफरीजने अदानी समूहाबाबत विधायक मत नोंदवले. यानंतर शुक्रवारी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स हे 14 टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात 84,064 कोटी रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी व्यवहार संपल्यावर अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 17.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जेफ्रीज कंपनीने अदानी समूहाची एक महत्त्वाकांक्षी विस्तार योजना उघड करताना म्हटलं आहे की, अदानी समूह पुढील दशकात 90 अब्ज डॉलर भांडवल खर्च करेल. यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली.
अदानी समूहासाठी माील वर्ष ठरले आव्हानात्मक
गौतम अदानी हे जगातील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $207 अब्ज आहे. अर्नॉल्ट यांच्यानंतर एलॉन मस्क यांचे नाव येते. त्यांची एकूण संपत्ती 199 अब्ज डॉलर इतकी आहे. अदानी समुहासाठी गतवर्ष अत्यंत आव्हानात्मक होते आणि हिंडेनबर्गच्या अहवालातील खुलाशानंतर सर्वोच्च न्यायालयानेही आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते. यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आता हा समूह या धक्क्यातून सावरला आहे. गेल्या आठवड्यातच, गौतम अदानी यांनी भविष्यात समूहाच्या विस्तारासाठी आशावादी योजना सामायिक केल्या होत्या.
हेही वाचा :
तिसऱ्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारात आलाय अदानी, अंबानींचा मुद्दा
अदानी पोर्ट्सने ३ हजार ८० कोटीला आणखी एक बंदर घेतले विकत
Vibrant Gujarat Summit 2024 | गुजरातमध्ये २ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाख नोकऱ्यांची निर्मिती, अदानींची घोषणा