शनिवारवाड्यावर ‘बॉम्बा’बोंब!

पुणे/कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : शनिवारवाड्यात बेवारस पिशवी सापडल्यानंतर त्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्ब शोध व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेतली. पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, काही काळ शनिवारवाडा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला …

शनिवारवाड्यावर ‘बॉम्बा’बोंब!

पुणे/कसबा पेठ : Bharat Live News Media वृत्तसेवा : शनिवारवाड्यात बेवारस पिशवी सापडल्यानंतर त्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्ब शोध व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेतली. पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, काही काळ शनिवारवाडा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.
बेवारस पिशवीत संशयास्पद वस्तू आढळल्याने घबराट
शनिवारवाडा परिसरात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास एक पिशवी सापडली. पिशवी सापडल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘बीडीडीएस’च्या पथकाने शनिवारवाडा परिसरातील पिशवीची पाहणी केली, तेव्हा पिशवीत बॉम्बसदृश किंवा संशयास्पद वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. संबंधित पिशवी पर्यटकाची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बॉम्बच्या अफवेमुळे शनिवार वाडा रिकामा करण्यात आला होता. तसेच, काही काळ पर्यटकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.
तसेच, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बाजीराव रस्ता किंवा शिवाजी रस्त्यावरून जाणारे वाहनचालक थांबून नेमके काय सुरू आहे, हे पाहत होते. त्यामुळे तेथील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
हेही वाचा 

MHADA Corruption | म्हाडाच्या मुख्याधिकार्‍यांच्या नावे पावणेतीन लाखांची लाच
अल्पवयीन मुलीकडून ‘हिट अन्ड रन’
Lok Sabha Exit Poll 2024 | मतमोजणीसाठी पाचशेहून अधिक सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा