पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील नादियामध्ये एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हफीझुल शेख असे ठार झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून तो नुकताच भाजपमध्ये दाखल झाला होता. शनिवारी (दि.१) संध्याकाळी त्याच्या चहाच्या दुकानातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
हफीझुल शेख याच्या डोक्यात गोळी लागली होती. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा शेख याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मात्र संशयित आरोपी आणि हफीज या दोघांच्याही नावावर याआधी गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपीची ओळख पटली असली तरी त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : 

अमृतसरमध्ये मतदानापूर्वी आप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
केजरीवालांचा अंरिम जामीन संपणार, आज आत्मसमर्पण करणार