काॅम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दीक्षांत सोहळा
नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : नाशिक रोड, गांधीनगर येथील काॅम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुल मध्ये खडतर प्रशिक्षण पुर्ण करणा-्या लष्करी जवानांनी बुधवारी सादर केलेल्या चित्तथराक प्रात्याक्षिकांनी उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फेडले, युध्दजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे तैयार हम चा विश्वास या जवानांनी जागविला निमित्त होते युध्दजन्य परिस्थितीत हेलिकाॅप्टरव्दारे मदतकार्य करणे, सौन्याला रसद जखमींना उपचारार्थ हलविणे आदीबाबात प्रशिक्षण देणा-्या कॅटस मधील एव्हीएटर्सचे प्रगत प्रशिक्षण यशस्वी पर्ण करणा-्या तुकड्यांना महासंचालक आणि कर्नल कमांडंट आर्मी एव्हिएशन कॉर्प्स लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांचे हस्ते विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी विंग्स/बॅज प्रदान सोहळ्याचे
.प्रशिक्षणा दरम्यान या अधिका-यांनी कठोर उड्डाण आणि जमिनीवर प्रशिक्षण घेतले. कॉम्बॅट एव्हिएटर्स/आरपीएएस क्रू म्हणून त्यांच्या नवीन भूमिकेसाठी सज्ज झाले. यावेळी जवानांसह त्यांच्या पालक, नातेवाईकांचे अभिमानाने ऊर भरुन आले होते. या तुकड्याचे प्रारंभी मैदांनावर बॅन्ड पथकांच्या कदम कदम बढाए जा…, या धुनवर संचलन करीत मानवंदना दिली. दीक्षांत सोहळ्यानंतर सारे जहाॅसे अच्छा हिंदोस्ता हमारा… संगीताच्या तालावर तुकड्याचे प्रस्थान करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
ड्रोनची प्रात्याक्षिके
विंग प्रदान सोहळ्या प्रसंगी मानवविरहित टेहाळणी ड्रोनची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. ड्रोनव्दारे शत्रूच्या तळाचा वेध घेत लढाऊ हेलिकाॅप्टरच्या मदतीने हल्ले करण्याची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.
विशेष सन्मान मिळविलेले प्रशिक्षणार्थी
ट्रॉफी विजेत्यांपैकी कॅप्टन हंसजा शर्मा हिला कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स अनुक्रमांक 40 च्या एकूण गुणवत्तेत प्रथम आल्याबद्दल रौप्य चित्ता ट्रॉफी देण्यात आली. मेजर आकाश मल्होत्रा यांना ओव्हरऑल बेस्ट ऑफ आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स (एएचआयसी) मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मेजर दिवाकर शर्मा यांना बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) (अंतरिम पायलट-०३) मध्ये ‘बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट’ ट्रॉफी आणि ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ आणि मेजर एन.आर. जोशी यांना ‘बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट’ ट्रॉफी प्रदान करण्यात आली. बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम मध्ये प्रथम गुणवत्तेच्या क्रमाने प्रथम आल्याबद्दल ट्रॉफी देण्यात आली.
कार्यक्रमांस नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपआयुक्त मोनका राऊत, आदि अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणार्थीचे कुंटूंबीय, पोतदार स्कुलचे विद्यार्थी, आजी माजी लष्करी अधिकारी, त्याचे कुटूंब, उपस्थित होते. खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्याबदल कुटूंबीयांकडून प्रशिक्षणार्थीचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रामनंतर ध्रुव, युव्हीए, चेतक या हॅलीकाॅप्टर सोबत फोटोसेशन केले.
The post काॅम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दीक्षांत सोहळा appeared first on पुढारी.
नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : नाशिक रोड, गांधीनगर येथील काॅम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुल मध्ये खडतर प्रशिक्षण पुर्ण करणा-्या लष्करी जवानांनी बुधवारी सादर केलेल्या चित्तथराक प्रात्याक्षिकांनी उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फेडले, युध्दजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे तैयार हम चा विश्वास या जवानांनी जागविला निमित्त होते युध्दजन्य परिस्थितीत हेलिकाॅप्टरव्दारे मदतकार्य करणे, सौन्याला रसद जखमींना उपचारार्थ हलविणे आदीबाबात प्रशिक्षण …
The post काॅम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दीक्षांत सोहळा appeared first on पुढारी.