श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : जीर्णोद्धारासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंशतः बंद असलेले पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर रविवार, दि. 2 पासून खुले होणार आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सन्मान दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते होणार …

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून

सोलापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : जीर्णोद्धारासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंशतः बंद असलेले पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर रविवार, दि. 2 पासून खुले होणार आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सन्मान दै. ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या सन्मान सोहळ्यास आरोग्यमंत्री तानाजी सावंत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि पंढरपुरातील पत्रकारांचाही गौरव श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून रविवारी (दि. 2) होणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांच्या संत तुकाराम भवन येथे होणार्‍या या कार्यक्रमास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि पंढरपूर-मंगळवेढ्याचे आ. समाधान आवताडे हे उपस्थित राहणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी दिली.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन महिने पाच दिवसांपासून अंशतः बंद आहे. मंदिरात अलीकडील काळात केलेले बांधकाम या जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान उतरवण्यात आले. यामुळे मंदिरास गत पुरातन वैभव प्राप्त झाले आहे. सातशे वर्षांपूर्वी जसे मंदिर दिसत होते तसेच मंदिर आता दिसू लागले आहे. काळ्या पाषाणातील मंदिराचे देखणे रूप, जुन्या खुणा, संदर्भ घेऊन जिवंत झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारपासून भाविकांसाठी मंदिर खुले होत आहे. या कामामध्ये चोख भूमिका पार पाडलेल्या सर्व मान्यवरांचा यानिमित्ताने सन्मान होत आहे.