नांदेड : दुचाकीच्या धडकेत एक कामगार ठार

भोकर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील उड्डाणपुलावरून चालत जाणाऱ्या हॉटेल आचारी कामगाराला दुचाकीने धडक दिली. या घटनेत दुचाकीची जोरात धडक बसल्याने नागोराव धोंडीबा सुर्यवंशी यांचा (वय 54, रा. म. फुलेनगर, भोकर) जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज (दि.1) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुर्यवंशी हे नांदेड शहरातील एका हॉटलमध्ये आचारी म्हणून काम करायचे. ते दिवसभर हॉटेलमध्ये …

नांदेड : दुचाकीच्या धडकेत एक कामगार ठार

भोकर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील उड्डाणपुलावरून चालत जाणाऱ्या हॉटेल आचारी कामगाराला दुचाकीने धडक दिली. या घटनेत दुचाकीची जोरात धडक बसल्याने नागोराव धोंडीबा सुर्यवंशी यांचा (वय 54, रा. म. फुलेनगर, भोकर) जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज (दि.1) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
सुर्यवंशी हे नांदेड शहरातील एका हॉटलमध्ये आचारी म्हणून काम करायचे. ते दिवसभर हॉटेलमध्ये काम करुन उड्डाणपुलावरून पायी घरी निघाले होते. दरम्यान नांदेडमध्ये जाणाऱ्या नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीने त्यांना जबर धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात दुचाकीस्वार ही जखमी झाले. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वार श्रीकांत सिताराम गुडले आणि अमोल मारोती कंदेवाड (रा. चिदव नगीरी) यांना ताब्यात घेतले.  त्यांच्या अकाळी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा : 

वर्धा : बियाण्यांच्या सॅम्पलचे कृषी केंद्रांचे सुमारे ७० लाख रुपये थकीत
एक्झिट पोलकडे पाहत नाही, माझा विजय निश्चित : नारायण राणे
अकोला: आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ