चेन्नई : अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची कारवाई; मानवी दूध विकणाऱ्या दुकानाला ठोकले ताळे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.31) माधवरम येथील प्रोटीन पावडर विक्री केंद्र सील केले, या केंद्रात आईच्या दुधाची विक्री केली जात होती. प्रथिने पावडर विकण्याचा परवाना असलेला दुकान मालक 500 रुपये प्रति 50 मिली बाटलीने मानवी दुधाची बेकायदेशीरपणे विक्री करत होता, अन्न सुरक्षा असे अधिकाऱ्याने सांगितले.
मागील आठवड्यात केंद्रीय परवाना प्राधिकरणाला माधवरममध्ये मानवी दूध विक्रीसाठी साठवले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर छापा टाकून दुकानातून आईच्या दुधाच्या सुमारे 50 बाटल्या जप्त केल्या. चेन्नईमध्ये आईच्या दुधाची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आम्हाला मानवी दूध बाटल्यांमध्ये साठवलेले आढळले. त्यानंतर दूध बाटल्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, या कारवाई दरम्यान देणगीदारांचे फोन नंबर सापडले. यानंतर त्याच्यांवर योग्य ती कारवाई करुन आम्ही दुकान सील केल्याचे अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :
वर्धा : बियाण्यांच्या सॅम्पलचे कृषी केंद्रांचे सुमारे ७० लाख रुपये थकीत
Cristiano Ronaldo : रोनाल्डोला अश्रू अनावर; किंग्स कप फायनलमध्ये अल नासरचा पराभव
Lok Sabha Election Exit Poll : भाजपला मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील : प्रशांत किशोर