टीव्ही अभिनेत्री रिद्धिमापंडित सोबत लग्न करणार शुभमन गिल?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि क्रिकेटर शुभमन गिलच्या लग्नाची सध्या चर्चा होतेय. वृत्तानुसार, रिद्धिमा आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान शुभमन गिलसोबत लग्न करणार आहे. हे लग्न डिसेंबरमध्ये होईल, असेही म्हटले जात आहे. या वृत्तात किती सत्यता आहे, याबद्दल रिद्धिमाने काय ‘बहू हमारी रजनीकांत’ मधून रिद्धिमा पंडित लोकप्रिय झाली होती.
अधिक वाचा –
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच
एका वेबसाईटनुसार, रिद्धिमा पंडितने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये लिहिलंय, ‘मी पत्रकारांच्या खूप साऱ्या फोन कॉल्सने जागी झाले. ते माझ्या लग्निविषयी विचारत होते. पण काय लग्न? मी लग्न करत नाहीये. आणि माझ्या लाईफमध्ये जर असं काही खास होईल तर मी स्वत: जाहीर करेन.’
रिद्धिमा पंडित काय म्हणाली?
तिने पुढे म्हटलंय की, “या वृत्तामध्ये कोणतीही सत्यता नाही.” रिद्धिमा पंडितला ‘बहू हमारी रजनीकांत’ मधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतून ती रातोंरात स्टार झाली होती. यामध्ये तिने एका रोबोटची भूमिका साकारली होती. रिद्धिमा ‘खतरा खतरा खतरा’ यासारख्या मालिकेसाठीही ओळखली जाते. ती बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीजनमध्येही दिसली होती.
अधिक वाचा –
‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट
आतापर्यंत शुभमन गिलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शुभमन गिलचे नाव क्रिकेटर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरशी देखील जोडलं गेलं आहे.
अधिक वाचा –
कोल्हापूरशी आर माधवनचे ऋणानुबंध; आवडत्या मिसळीचा कट अन् बरंच काही…