अखेरच्‍या टप्‍प्‍यात मतदारांच्‍या उत्‍साहाला उधाण, दुपारी एकपर्यंत ४० टक्‍के मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु आहे. लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह: दुपारी 1 वाजेपर्यंत, निवडणूक आयोगाच्या (EC) मतदार-टर्नआउट ॲपनुसार अंदाजे मतदानाची टक्केवारी 40.09% नोंदली गेली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत राजनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे कंसात टक्‍केवारी : बिहार ( …

अखेरच्‍या टप्‍प्‍यात मतदारांच्‍या उत्‍साहाला उधाण, दुपारी एकपर्यंत ४० टक्‍के मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क :  लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु आहे. लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह: दुपारी 1 वाजेपर्यंत, निवडणूक आयोगाच्या (EC) मतदार-टर्नआउट ॲपनुसार अंदाजे मतदानाची टक्केवारी 40.09% नोंदली गेली आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत राजनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे कंसात टक्‍केवारी : बिहार ( 35.65 ), चंदीगड ( 40.14 ), हिमाचल प्रदेश ( 48.63 ), झारखंड ( 46.80 ), ओडिशा ( 37.64 ), पंजाब ( 37.80), उत्तर प्रदेश ( 39.31), पश्चिम बंगाल ( 45.07)

#LokSabhaElections2024 | 40.09% voter turnout recorded till 1 pm, in the 7th phase of elections.
Bihar 35.65%
Chandigarh 40.14%
Himachal Pradesh 48.63%
Jharkhand 46.80%
Odisha 37.64%
Punjab 37.80%
Uttar Pradesh 39.31%
West Bengal 45.07% pic.twitter.com/4jsl6EwUjG
— ANI (@ANI) June 1, 2024

अखेरच्या टप्प्यात 57 मतदारसंघात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान होऊ घातलेल्या ठिकाणी एक कोटी 9 लाख मतदान केंद्रे आहेत. तिथे 10 कोटी 9 लाख कर्मचार्‍यांना नेमण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात 10 कोटी 6 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 5 कोटी 24 लाख पुरुष आणि 4 कोटी 28 लाख महिला मतदारांचा समावेश आहे.
अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 व चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे.  4 जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यात भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 9, बिहारमधील 5, हिमाचल प्रदेश 4, झारखंड, ओडिशा आणि पंजाबमधील प्रत्येकी दोन आणि चंदीगडच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त 13 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा या सर्व जागा जातीय समीकरणात अडकल्या आहेत. कुशीनगर, देवरिया, सलेमपूर, बलिया, महाराजगंज आणि रॉबर्टस्गंज मतदारसंघात जातीच्या आधारावर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
बिहारमधील पाटलीपुत्र, आरा आणि बक्सरमध्येही जातीय समीकरणामुळे भाजपची वाट अवघड बनली आहे. आरा येथून केंद्रीय मंत्री आर. के. सिंह निवडणूक लढवत आहेत. पाटलीपुत्र येथून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती नशीब आजमावत आहेत. मीसा भारती यांची भाजपचे खासदार रामकृपाल यादव यांच्याशी टक्कर आहे. पंजाबमध्ये गेल्यावेळी भाजपने अकाली दलासोबतच्या युतीत 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे.
सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे
मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच 3 केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.
 
 

Go to Source