एक्झिट पोल म्हणजे काय? ओपिनियन पोलपेक्षा किती वेगळा? जाणून घ्या सविस्तर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे असणार आहेत. आज (दि.१जून) सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की, एक्झिट पोल जाहीर होतील. जाणून घेवूया एक्झिट पोल म्हणजे काय? आणि ओपिनियन पोलपेक्षा तो किती वेगळा असतो याविषयी…
एक्झिट पोल म्हणजे काय?
लोकसभा निवडणूक असो की विधानसभा. मतदानाच्या दिवशी वृत्तवाहिन्या आणि एक्झिट पोलिंग एजन्सीचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर उपस्थित असतात. मतदान केल्यानंतर मतदारांना निवडणुकीशी संबंधित काही प्रश्न विचारले जातात. त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे अहवाल तयार केला जातो. या अहवालाच्या मुल्यांकनातून निवडणुकीत मतदारांचा कल कुठे आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे एक्झिट पोल सर्व्हेमध्ये फक्त मतदारांचा समावेश असतो.
एक्झिट पोल जाहीर करण्याचा नियम काय सांगतो?
केंद्रीय निवडणूक आयोगाने १९९८ मध्ये सर्वप्रथम एक्झिट पोल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. २०१० मध्ये सहा राष्ट्रीय आणि १८ प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने कलम १२६A अंतर्गत निवडणूक प्रचार काळात एक्झिट पोल करण्यातवर बंदी घालण्यात आली होती. नियमानुसार, निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोणताही एक्झिट पोल किंवा ओपिनियम पोल जाहीर करता येत नाही. मतदानाचा शेवटचा टप्पा दिवशी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासातच एक्झिट पोल जाहीर होऊ शकतो. कप्रतिनिधी कायदा-1951 च्या कलम 126A अंतर्गत, मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल जारी करण्यास बंदी आहे. उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ओपिनियन आणि एक्झिट पोल जारी करताना सर्व्हे एजन्सीचे नाव, किती मतदार आणि कोणते प्रश्न विचारण्यात आले याचा उल्लेख करण्याच्या सूचना आहेत.
ओपिनियन पोल म्हणजे काय?
ओपिनियन पोल हे निवडणूक काळातील सर्वेक्षण आहे; पण ते निवडणुकीपूर्वी केले जाते. यामध्ये सर्व लोकांचा समावेश हाेताे. या सर्वेक्षणात सहभागी हाेणारे तुमच्या जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश हाेता. यामध्ये मतदार असण्याची अट बंधनकारक नाही. या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांच्या आधारे प्रदेशनिहाय मतदारांचा कौल कोणाकडे आहे याा अंदाज लावला जातो. जनतेला कोणती योजना आवडते की नापसंत आहे. जनता कोणत्या राजकीय पक्षांच्या धोरणावर खूश आहे, याचा अंदाज जनमत चाचण्यांवरून येतो.
Home महत्वाची बातमी एक्झिट पोल म्हणजे काय? ओपिनियन पोलपेक्षा किती वेगळा? जाणून घ्या सविस्तर
एक्झिट पोल म्हणजे काय? ओपिनियन पोलपेक्षा किती वेगळा? जाणून घ्या सविस्तर
पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे असणार आहेत. आज (दि.१जून) सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की, एक्झिट पोल जाहीर होतील. जाणून घेवूया एक्झिट पोल म्हणजे काय? आणि ओपिनियन पोलपेक्षा …