‘इंडिगो’ फ्लाइट’ बॉम्बने उडवण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क: विमानवाहतूक कंपनी इंडिगोने आज (दि.१) एक प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये त्यांनी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो 6E 5314 फ्लाइटला बॉम्ब असल्याची धमकी (IndiGo receives Bomb threat) मिळाली आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्याला फ्लाइटच्या स्वच्छतागृहात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. अशी माहिती कंपनीने प्रसिद्ध कलेल्या निवेदनात दिली आहे, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. यापूर्वी काही …
‘इंडिगो’ फ्लाइट’ बॉम्बने उडवण्याची धमकी


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: विमानवाहतूक कंपनी इंडिगोने आज (दि.१) एक प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये त्यांनी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो 6E 5314 फ्लाइटला बॉम्ब असल्याची धमकी (IndiGo receives Bomb threat) मिळाली आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्याला फ्लाइटच्या स्वच्छतागृहात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. अशी माहिती कंपनीने प्रसिद्ध कलेल्या निवेदनात दिली आहे, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. तेव्हा देखील स्वच्छतागृहातच चिठ्ठी सापडली होती. यामधून बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. अशाचप्रकारची ही दुसरी घटना आहे.
पुढे वृत्तात म्हटले आहे की, विमान मुंबईत उतरल्यानंतर क्रुने प्रोटोकॉलचे पालन करत, सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान एका विलगीकरण खाडीत नेण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप विमानातून उतरले आहेत. विमानाची सध्या तपासणी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल, असे देखील कंपनीने (IndiGo receives Bomb threat) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

IndiGo issues a press statement – IndiGo flight 6E 5314 operating from Chennai to Mumbai had received a bomb threat. Upon landing in Mumbai, the crew followed protocol and the aircraft was taken to an isolation bay as per security agency guidelines. All passengers have safely… pic.twitter.com/sdgH9ZrgRx
— ANI (@ANI) June 1, 2024

यापूर्वी दिल्ली-श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा

विस्तारा कंपनीच्या दिल्ली – श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी मिळाल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांमध्ये भीतीचे काहूर उठले. या धमकीनंतर तपास करताना विमानतळ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दिल्लीतून विस्तारा कंपनीचे UK-611 विमान १७८ प्रवासी घेऊन श्रीनगरला रवाना झाले. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रकांना विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा कॉल (IndiGo receives Bomb threat) आला. मात्र, धमकीनंतर शोधाशोध आणि तपास केल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील अनेक रुग्णालये, शाळा, महाविद्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. असे वृत्त माध्यमातून समोर आले होते.

Go to Source