‘काँग्रेस नेते अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार’

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. यामुळे काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. व त्यांच्याकडून मिळणा-या … The post ‘काँग्रेस नेते अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार’ appeared first on पुढारी.
#image_title
‘काँग्रेस नेते अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार’


मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. यामुळे काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. व त्यांच्याकडून मिळणा-या माहितीच्या आधारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या 

रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेकडे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांची पाठ
पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा कांगावा : रामदास आठवले
Parbhani News : मानवतच्या शाळेत शिक्षकच गैरहजर; शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याची पाहणी दौऱ्यासाठी नेत्यांना जिल्हावार जबाबदारी दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्याची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली आहे. माजी मुख्यमंत्री व सीडब्ल्यूसी सदस्य अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे नागपूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना ठाणे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदेंना लातूर, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटीलांना अहमनगर, माजी मंत्री सुनिल केदार यांना वर्धा, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना अकोला, विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांना सातारा, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना सोलापूर, माजी मंत्री वसंत पुरके यांना चंद्रपूर, माजी मंत्री पद्माकर वळवी यांना धुळे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांना बुलढाणा, आ. सुभाष धोटे यांना गडचिरोली, आ. संग्राम थोपटेंना सांगली याच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
तर प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर यांना परभणी, आ. अभिजीत वंजारी यांना गोंदिया, माजी मंत्री आ. रणजित कांबळे यांना अमरावती, आ. राजेश राठोड- धाराशीव, आ. ऋतुराज पाटील- रत्नागिरी, आ. अमित झनक- यवतमाळ, आ. धीरज देशमुख -बीड, आ. रविंद्र धंगेकर- कोल्हापूर, प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील -नंदूरबार, माजी खा. हुसेन दलवाई- पालघर, सुरेश टावरे- रायगड, नाना गावंडे -भंडारा, संजय राठोड -जळगाव, माजी आ. हुस्नबानो खलिफे -सिंधुदुर्ग, माजी आ. विरेंद्र- वाशीम, माजी आ. विजय खडसे- हिंगोली, माजी आ. नामदेवराव पवार- जालना जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी चर्चा करणार आहेत.
The post ‘काँग्रेस नेते अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार’ appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. यामुळे काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. व त्यांच्याकडून मिळणा-या …

The post ‘काँग्रेस नेते अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार’ appeared first on पुढारी.

Go to Source