रामदेववाडी प्रकरणातील कागदपत्रे तपासणीसाठी नाशिकला

जळगाव पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील रामदेव वाडी कार व मोटरसायकल अपघात प्रकरणात चार जणांचा जीव गेला होता. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे व तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यावर आज दि. 31 रोजी न्यायालयात सुनावली झाली. मात्र कागदपत्र नाशिकला तपासण्यासाठी गेले असे कारण सांगण्यात आल्यामुळे यावर पुढील सुनावणी एक जुलैला होणार आहे. तर … The post रामदेववाडी प्रकरणातील कागदपत्रे तपासणीसाठी नाशिकला appeared first on पुढारी.

रामदेववाडी प्रकरणातील कागदपत्रे तपासणीसाठी नाशिकला

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा- तालुक्यातील रामदेव वाडी कार व मोटरसायकल अपघात प्रकरणात चार जणांचा जीव गेला होता. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे व तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यावर आज दि. 31 रोजी न्यायालयात सुनावली झाली. मात्र कागदपत्र नाशिकला तपासण्यासाठी गेले असे कारण सांगण्यात आल्यामुळे यावर पुढील सुनावणी एक जुलैला होणार आहे. तर तिन्ही संशयितांच्या वकिलाने याबाबत आक्षेप नोंदवित इंटरियर जामीन देण्याची मागणी लावून धरली.
रामदेव वाडी अपघात प्रकरणात आईसह दोन मुले व भाचा असा चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणांमध्ये आज न्यायालयात दुपारी सुनावणी झाली. या प्रकरणाचे तपासी अधिकारी डीवायएसपी संदीप गावित यांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला मात्र तपासाची कागदपत्रे नसल्यामुळे आम्ही यावर आर्ग्युमेंट करू शकत नाही असे सरकारी वकिलांनी सांगितले. कागदपत्रे हे नाशिक येथे तपासणीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. यावरून माननीय न्यायालयाने पोलिसांना चांगले धारेवर धरले.
या प्रकरणातील आरोपी अर्णव कौल, अभिषेक पवार, ध्रुव सोनवणे यांच्या वकिलाने न्यायालयाने अंतरिम जामीन द्यावा यासाठी अर्जंट केले व स्टेशन डायरी किंवा फिर्यादीवरून त्याने अर्ग्युमेंट करावे अशी त्यांनी मागणी केली. मात्र शेवटी न्यायालयाने एक तारखेला या प्रकरणी सुनावणी ठेवली.
हेही वाचा –

Bhusawal firing | भुसावळ दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयितास नशिकमधून ठोकल्या बेड्या
ईअर टॅगिंगची शनिवारपासून अंमलबजावणी; पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

Latest Marathi News रामदेववाडी प्रकरणातील कागदपत्रे तपासणीसाठी नाशिकला Brought to You By : Bharat Live News Media.