अभिमानास्पद: काम्या कार्तिकेयनने १६ व्या वर्षी सर केले माउंट एव्हरेस्ट
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी मुंबईतील काम्या कार्तिकेयन (Kamya Karthikeyan) सर्वात तरुण भारतीय ठरली आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने ही कामगिरी फत्ते केली आहे. तिच्या या पराक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
१६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारी कोण आहे काम्या कार्तिकेयन
काम्या मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये शिकत आहे
तिचे वडील कमांडर एस कार्तिकेयन हे भारतीय नौदलात अधिकारी
माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली आहे.
सातव्या वर्षी उत्तराखंडमध्ये हिमालयात पहिला ट्रेक
काम्या कार्तिकेयन (Kamya Karthikeyan) म्हणाली की, मी नुकतेच माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. नेपाळमधील एव्हरेस्ट शिखर सर करणारी मी जगातील दुसरी तर भारतातील पहिली तरुणी ठरली आहे. एव्हरेस्ट सर करणे माझे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. हे साध्य झाल्याने मी आनंदी आहे. मी वयाच्या सातव्या वर्षी उत्तराखंडमध्ये हिमालयात पहिला ट्रेक केला होता. तेव्हापासून माझ्यात ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. 2017 मध्ये मी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला होता. माउंट एव्हरेस्ट हे सातपैकी सहावे शिखर होते, ते मी जिंकले होते.
हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे
काम्याचे वडील कमांडर एस कार्तिकेयन म्हणाले की, ‘माझ्या मुलीने माऊंट एव्हरेस्ट सर केले. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरली आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. काम्याला सर्वोच्च शिखर असलेल्या सात शिखरांवर चढाई करायची आहे. गेल्या सात वर्षांपासून ती हे काम करत आहे. अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन मासिफ सर करण्याचे आमचे पुढचे ध्येय आहे.
Kamya Karthikeyan : पिता-पुत्रीने एकत्रित यश संपादन केले
कार्तिकेयन पिता-पुत्रीने 20 मे 2024 रोजी नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट (8849 मीटर) ची चढाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. काम्याने सात खंडांतील सहा सर्वोच्च शिखरे सर करण्यात यश मिळवले आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन मॅसिफवर चढाई करण्याचे तिचे ध्येय आहे, जेणेकरून ती जगातील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचे आव्हान पूर्ण करणारी सर्वात तरुण मुलगी बनू शकेल.
नौदलातील एका प्रवक्त्याने सांगितले की, काम्या आणि तिचे वडील कमांडर एस कार्तिकेयन यांनी 20 मे रोजी एव्हरेस्ट (8,849 मीटर) यशस्वी चढाई केली होती. या यशानंतर जगातील सर्वोच्च शिखर सर करणारी ती जगातील दुसरी आणि भारतातील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली आहे.
काम्या मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये शिकत आहे. तर तिचे वडील कमांडर एस कार्तिकेयन हे भारतीय नौदलात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra: 16-year-old Kamya Karthikeyan claims she’s the youngest Indian and second youngest girl in the world to scale Mt. Everest.
She says, “… I recently summited Mt. Everest… I became the second youngest girl in the world and the youngest Indian to… pic.twitter.com/ZynYYbrUd6
— ANI (@ANI) May 31, 2024
हेही वाचा
ईशाने मुलींपासून लपवली भरत तख्तानीसोबत घटस्फोटाची माहिती
अन्… मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्ती गुल
ब्रेकिंग | प्रज्वल रेवण्णाला ६ दिवसांची पोलीस कोठडी
Latest Marathi News अभिमानास्पद: काम्या कार्तिकेयनने १६ व्या वर्षी सर केले माउंट एव्हरेस्ट Brought to You By : Bharat Live News Media.