
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : धमाकेदार ‘पंचायत ३’ ही वेबसीरीज २८ मे २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. ही वेबसीरीज पडद्यावर येताच चाहत्यांनी तिला भरभरून प्रतिसाद दिलाय. सध्या या वेबसीरीजमधील एकापेक्षा एक हिट कलाकारांच्या पात्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान सचिवचा सहाय्यक विकासची पत्नी ”खुशबू भाभी” या पात्राने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या वेबसीरीमध्ये विकासची मुख्य भूमिका अभिनेता चंदन रॉयने साकारली आहे. तर त्याच्या पत्नी म्हणजे, ”खुशबू भाभी” ची भूमिका अभिनेत्री तृप्ती साहूने साकारली आहे. तर तृप्ती साहू खऱ्या आयुष्यातही खूपच ग्लॅमरस आहे.
तृप्ती साहूविषयी हे माहित आहे काय?
तृप्ती साहूची धमाकेदार ‘पंचायत ३’ ही वेबसीरीज सध्या गाजत आहे.
‘पंचायत ३’ या वेबसीरीजमध्ये तिने ”खुशबू भाभी”ची भूमिका साकारली आहे.
सोशल मीडियावर तृप्ती साहू सक्रिय असते.
‘पंचायत ३’ ही वेबसीरीजमध्ये अभिनेत्री जितेंद्र कुमार, अभिषेक त्रिपाठी, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मल्लिक, चंदन रॉय, सान्विका, साद बिलग्रामी, विनोद सुर्यवंशी, विशाल यादव, कुसुम शास्त्री, पंकज झा आणि गौरव सिंह या कलाकारांनी भारदस्त अभिनय साकारलाय. अभिनेता चंदन रॉय यांनी या बेवसीरीजमध्ये विकासची भूमिका केली. आहे. मात्र, सध्या विकास म्हणजे, चंदन रॉय पत्नी खुशबू भाभीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. खुशबू भाभीची मुख्य भूमिका अभिनेत्री तृप्ती साहूने उत्तररित्या पार पडलीय.
तर दुसरीकडे तृप्ती साहू खऱ्या आयुष्यातही खूपच ग्लॅमरस आहे. तिचे सोशल मीडियावर एकापेक्षा एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोसह व्हिडिओचा भरणा पाहायला मिळतोय. तिच्या प्रत्येक फोटोत तिचे नेहमीपेक्षा सौंदर्य खुलून दिसतेय. सोशल मीडियावर तृप्तीचे फॅन फालोव्हर्स ४ हजार ६ शेहून अधिक आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तृप्तीने आधी ‘शर्मा जी की बेटी’, ‘गुलमोहर’ आणि ‘तव्वाई’ या चित्रपटात भुमिका केली आहे. याशिवाय तिने पाच महिन्यांपूर्वी ‘इश्क का रंग’ या गाण्यातही काम केलं होते. यानंतर आता तिचा ‘पंचायत ३’ ही वेबसीरीज गाजत आहे. या वेबसीरीजमध्ये तिचे भुमिका छोटी आहे. परंतु, तिला लोकप्रियता मिळाली आहे.
हेही वाचा
बालपणी कापूस विकत होता ‘पंचायत-३’चा बिनोद, अशोक पाठकची हटके कहाणी
अजय देवगन-तबूच्या ‘औरों में कहा दम था’ची तारीख रिलीज
Nandamuri Balakrishna : भर कार्यक्रमात नंदामुरी बालकृष्णने दिला धक्का; ‘ही’ अभिनेत्री पडता-पडता वाचली
Latest Marathi News ‘पंचायत ३’ फेम खुशबू भाभी आहे कोण?; खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस Brought to You By : Bharat Live News Media.
