अकोला : मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, लॅपटॉपला मज्जाव

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जूनला वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात एम आय डी सी मध्ये होणार आहे .मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, लॅपटॉप ला मज्जाव करण्यात आला असून या निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अकोला शहरानजीक असलेल्या शिवणी येथील एमआयडीसी फेज क्र. ४ मधील महाराष्ट्र राज्य वखार …

अकोला : मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, लॅपटॉपला मज्जाव

अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोला लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जूनला वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात एम आय डी सी मध्ये होणार आहे .मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, लॅपटॉप ला मज्जाव करण्यात आला असून या निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अकोला शहरानजीक असलेल्या शिवणी येथील एमआयडीसी फेज क्र. ४ मधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात होणार आहे. त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
अकोला मतदारसंघाच्या गेल्या २६ एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी रोजी मतदान पार पडले होते . आता दी ४ जून ला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात १०० मीटर परिसरात मोबाईल व लॅपटॉप वापराला बंदी राहणार आहे .मत मतमोजणी केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. या नियामाचे कोणीही उल्लंघन करू नये, असे सूचित करण्यात आले आहे .
मतमोजणी केंद्रात मतमोजणी प्रक्रियेसाठी आणि विवीध कामाकरिता १ हजार १४२ अधिकारी व कर्मचारी राहतील .या सोबत पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांसह विवीध संवर्गातील पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठ्या संखेत बंदोबस्त राहणार असल्याची माहिती आहे.