पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा कांगावा : रामदास आठवले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार कामकाज करीत आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारवर अत्यंत चुकीचे खोडसाळ आरोप करीत आहे. काँग्रेसचे नेते संविधान वाचविले पाहिजे, असा कांगावा करीत आहेत, ते केवळ त्यांचा पक्ष वाचविण्यासाठी. प्रत्यक्षात संविधानाला कोणताही धोका नाही. भारतीय संविधानाचा गौरव करणारे पंतप्रधान … The post पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा कांगावा : रामदास आठवले appeared first on पुढारी.
#image_title

पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा कांगावा : रामदास आठवले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार कामकाज करीत आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारवर अत्यंत चुकीचे खोडसाळ आरोप करीत आहे. काँग्रेसचे नेते संविधान वाचविले पाहिजे, असा कांगावा करीत आहेत, ते केवळ त्यांचा पक्ष वाचविण्यासाठी. प्रत्यक्षात संविधानाला कोणताही धोका नाही. भारतीय संविधानाचा गौरव करणारे पंतप्रधान मोदी संविधानानुसार कारभार चांगला चालवत आहेत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

बांद्रा सिद्धार्थ कॉलनी येथे रिपाइं रोजगार आघाडीचे राज्य सरचिटणीस अमित तांबे यांनी आयोजित केलेल्या संविधान दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आठवले बोलत होते.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, आयोजक रिपाई रोजगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अमित तांबे, संजय खंडागळे, युवराज सावंत, जिल्हाध्यक्ष साधु कटके, सचिन कासारे आदी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. हे संविधान भारतीय लोकशाहीचे प्राण ठरले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी राजकारणामध्ये जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन पक्ष आम्हाला दिला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही कायम पुढे चालवू. आणि राजकीय पटलावर रिपब्लिकन पक्षाला जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचे काम आमही करेन, असा ठाम निर्धार आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा 

Salman Society : रामदास आठवलेंकडून ‘सलमान सोसायटी’ च्या टीमचं कौतुक
Ramdas Athavale : राहुल गांधींना शून्यावर बाद करणार : रामदास आठवले
‘तो’ पराभव विखेंमुळे नव्हेच ! : रामदास आठवले ; शिर्डी लोकसभेसाठी मी पुन्हा इच्छुक

The post पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा कांगावा : रामदास आठवले appeared first on पुढारी.

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार कामकाज करीत आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारवर अत्यंत चुकीचे खोडसाळ आरोप करीत आहे. काँग्रेसचे नेते संविधान वाचविले पाहिजे, असा कांगावा करीत आहेत, ते केवळ त्यांचा पक्ष वाचविण्यासाठी. प्रत्यक्षात संविधानाला कोणताही धोका नाही. भारतीय संविधानाचा गौरव करणारे पंतप्रधान …

The post पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा कांगावा : रामदास आठवले appeared first on पुढारी.

Go to Source