‘बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते’; फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदाच्या वर्षीदेखील थेट परकीय गुतंवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सलग दोन वर्षे महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाची परकीय गुंतवणूकीचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत शेअर केला आहे. यावेळी फडणवीसांनी ‘बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते’, असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले आहे. पुढे फडणवीसांनी म्हटले आहे की, महाविकास …
‘बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते’; फडणवीस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: यंदाच्या वर्षीदेखील थेट परकीय गुतंवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सलग दोन वर्षे महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाची परकीय गुंतवणूकीचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत शेअर केला आहे. यावेळी फडणवीसांनी ‘बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते’, असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले आहे.
पुढे फडणवीसांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. या आर्थिक वर्षांतील महाराष्ट्रातील गुंतवणूक ही गुजरातमधील गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असे देखील फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते…
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक 1 वर !
एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
केंद्र सरकारच्या… pic.twitter.com/2js1CYr59s
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 31, 2024

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक 1 वर आहे. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केल्याचे स्पष्ट करत, यावर्षीच्या एकूण राज्यातील गुंतवणुकीचा तक्ता फडणवीसांनी शेअर केला आहे.
हेही वाचा:

नीलेश लंकेंच्या विजयाचा फ्लेक्स पाथर्डीत जप्त
पालिकेसमोरच मांडल्या चुली अन् थापल्या भाकरी; पाण्यासाठी महिलांचे आंदोलन
..अन्यथा शिक्षक भारतीच्या वतीने आंदोलन! शिक्षक नेते गाडगे