अजित पवार नार्को टेस्ट कधी करताय? दमानियांनी ‘दादां’चे चॅलेंज स्वीकारलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यांचे आव्हान स्वीकारत अजित पवार यांनी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास अंजली दमानिया यांना संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान दिले होते. आता अजित पवार यांनीही ‘चॅलेंज …
अजित पवार नार्को टेस्ट कधी करताय? दमानियांनी ‘दादां’चे चॅलेंज स्वीकारलं

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुणे अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यांचे आव्हान स्वीकारत अजित पवार यांनी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास अंजली दमानिया यांना संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान दिले होते. आता अजित पवार यांनीही ‘चॅलेंज मंजुर आहे’ असे म्हणत त्यांचे प्रतिआव्हान स्विकारले आहे.
अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवार नार्को टेस्ट करायला तयार आहेत, असे माध्यमातून कळले. अग्रवाल कुटुंबाशी माझा काही संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फोन केला नाही, असे सिद्ध झाले. तर अंजली दमानियांनी घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा, असे अजित पवार (Anjali Damania Vs Ajit Pawar) म्हणाले.
यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चॉलेंज स्वीकारत “मी गप्प घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा” हे मला पूर्णपणे मान्य असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे कधी नर्को टेस्ट करताय ते लवकरात लवकर कळवा, नार्को टेस्ट चे प्रश्न मी पाठवेन, असे अंजली दमानिया यांनी अजित पवारांना (Anjali Damania Vs Ajit Pawar) विचारले आहे.

चैलेंज मंजुर आहे ।
अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले,की
“मी गप्प घरी बसव आणि सार्वजनिक… pic.twitter.com/mfa2aPcdHu
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 29, 2024

हेही वाचा:

Arvind Kejriwal News : केजरीवाल म्हणाले, ‘परवा मी आत्मसमर्पण करेन…
कोल्हापूर: दतवाड येथे ग्रा.पं. सदस्यासह पतीला मारहाण; जमावावर लाठीचार्ज
Jalgaon Lok Sabha Result | 4 जून ला कुणाच्या पक्ष कार्यालयात फुलणार ‘वसंत’?