एमपीएससी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

एमपीएससी परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा ; राज्य सरकारच्या विविध विभागांतील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा-2024, शुक्रवार 6 जुलै रोजी घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेच्या या तारखेत बदल करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून करण्यात आली आहे.
अराखीव किंवा आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जातप्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागासवर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच या प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा नव्या सुधारित तारखेनुसार 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
तसेच आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरिता अर्ज सादर करण्याचा कालावधी 31 मे ते 7 जून, 2024 असा राहणार आहे, असे आयोगाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा 

कपाशी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री : एकास अटक
Onion Auction | लासलगाव येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद
सतरा वर्षाच्या मुलीवर सावत्र पित्याकडून लैगिंक अत्याचार; वांद्रे येथील घटना