अकरावी प्रवेशअर्ज भरण्याची घाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया यंदा उशिरा होत आहे. दहावीच्या निकालापूर्वी दोन दिवस आधी ही प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यास गर्दी होत आहे. शाळेत फॉर्म भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्या दरवर्षी अकरावी प्रवेशाचा पहिला भाग हा महिनाभर आधी भरला जातो. विद्यार्थी रजिस्ट्रेशन, …

अकरावी प्रवेशअर्ज भरण्याची घाई

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया यंदा उशिरा होत आहे. दहावीच्या निकालापूर्वी दोन दिवस आधी ही प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यास गर्दी होत आहे.
शाळेत फॉर्म भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्या
दरवर्षी अकरावी प्रवेशाचा पहिला भाग हा महिनाभर आधी भरला जातो. विद्यार्थी रजिस्ट्रेशन, भाग एक भरणे, कॉलेज लॉगिनला जाऊन कॉलेज व्हेरिफाय करणे यादी सर्व सुविधा 25 मेपासून विद्यार्थी व कॉलेजेसला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व शाळेतील वर्गशिक्षक, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये न पाठवता आपल्या शाळेमधूनच फॉर्म भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा
दहावीचे ऑनलाईन मार्कशीट व दाखले विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा पार्ट टू भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरळीत होण्यासाठी शाळा व कॉलेजमधील सर्वांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे व कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच, सर्व शाळांनी आपापल्या शाळेतील इयत्ता दहावीच्या पालकांच्या ऑनलाईन सभा घेऊन प्रबोधन करावे, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा 

रूफ टॉपवरील हॉटेलवर हातोडा; पौड रोड परिसरात महापालिकेची कारवाई
NMC Flood Situation | पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज
महावितरणच्या सूचनेला पालिकेची केराची टोपली; काय आहे सूचना?