हिंदू-मुस्लिम विवाह बेकायदा

भोपाळ, वृत्तसंस्था : मुस्लिम समुदायातील तरुणाचा हिंदू मुलीसोबतचा विवाह बेकायदा असल्याचा निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिला. मध्य प्रदेशातील एका प्रकरणात मुस्लिम समुदायातील तरुण आणि हिंदू धर्मातील तरुणीने विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केले. त्यानंतर या दाम्पत्याने या विवाहाला मान्यता मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 1954 च्या विशेष विवाह कायद्याचा आधार घेत …

हिंदू-मुस्लिम विवाह बेकायदा

भोपाळ, वृत्तसंस्था : मुस्लिम समुदायातील तरुणाचा हिंदू मुलीसोबतचा विवाह बेकायदा असल्याचा निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिला.
मध्य प्रदेशातील एका प्रकरणात मुस्लिम समुदायातील तरुण आणि हिंदू धर्मातील तरुणीने विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केले. त्यानंतर या दाम्पत्याने या विवाहाला मान्यता मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 1954 च्या विशेष विवाह कायद्याचा आधार घेत या दाम्पत्याने विवाहाची नोंदणी करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणीही न्यायालयात केली होती. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. यावेळी न्यायालयाने दाम्पत्यास पोलिस संरक्षण देण्यासही नकार दिला.
खंडपीठाच्या विविध निर्णयांचा हवाला देत न्यायाधीश गुरुपालसिंह अहलुवालिया यांनी म्हटले की, मुस्लिम धर्मातील पसर्नल लॉ अशा विवाहांना मान्यता देत नाही. त्यामुळे या दाम्पत्याने विशेष कायद्याचा आधार घेऊन लग्नाची नोंदणी केला असली, तरी हा विवाह कायदेशीर ठरू शकत नाही. मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणीही दोघे धार्मिक आहेत. दोघांच्याही त्यांच्या धर्मावर श्रद्धा आहेत. त्यामुळे विशेष विवाहाचा आधार घेऊन लग्नाची नोंदणी जरी केली, तरी मुस्लिम धर्मातील वैयक्तिक कायद्यानुसार हा विवाह बेकायदाच ठरला जातो, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
हिंदू धर्मातील मुलीच्या नातेवाईकांनी न्यायालयात या विवाहास विरोध दर्शविला. मुलीच्या लग्नास मान्यता दिल्यास आम्हाला आमच्या धर्मात बहिष्कृत व्हावे लागेल, अशी भीतीही मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली होती.