जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असल्याच्या चर्चेनंतर महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भीमराव बबन साठे (रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणावर सध्या राजकारण तापले आहे. याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याकाठी बुधवारी (दि.29) आंदोलन केले. हे आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचे दिसून आले होते. यानंतर आव्हाड यांच्यावर सर्व स्तरांतून टीका झाली. अनावधानाने झालेल्या या घटनेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.
हेही वाचा
Prajwal Revanna : मोठी बातमी | प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावर अटक
मेडिको लीगल प्रकरणांसाठी नियमावली : डॉ. चंद्रकांत म्हस्के
सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत घेतले बिल्डरपुत्राच्या रक्ताचे नमुने!