Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: स्पेस स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसने अग्निबान (सबर्बिटल टेक डेमॉन्स्ट्रेटर) SORTED-01 मिशन आज (दि.३० मे) श्रीहरिकोटा येथील लॉन्च पॅडवरून यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. अग्निलेट इंजिनच्या सहाय्याने SOrTeD (सबऑर्बिटल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर) अग्नीबान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. ISRO ने अग्निकुल कॉसमॉसच्या (Agnibaan SoRTed-01) कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि प्रक्षेपणाला ‘एक मैलाचा टप्पा’ म्हटले आहे.
अग्निकुल कॉसमॉसने त्यांच्या लाँच पॅडवरून पहिल्या अग्निबान SoRTed-01 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये वापरण्यात आलेले ‘अग्निलेट इंजिन’ हे जगातील पहिले सिंगल-पीस 3D-प्रिंट केलेले अर्ध-क्रायोजेनिक रॉकेट इंजिन (Agnibaan SoRTed-01) आहे.
Agnibaan SoRTed-01: ‘अग्निकुल कॉसमॉस’विषयी…
अग्निकुल कॉसमॉस प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय एरोस्पेस उत्पादक कंपनी आहे. जी आयआयटी मद्रास, चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर कम्बशन आर अँड डी मध्ये स्थित आहे.
Humbled to announce the successful completion of our first flight – Mission 01 of Agnibaan SOrTeD – from our own and India’s first & only private Launchpad within SDSC-SHAR at Sriharikota. All the mission objectives of this controlled vertical ascent flight were met and… pic.twitter.com/9icDOWjdVC
— AgniKul Cosmos (@AgnikulCosmos) May 30, 2024
PM नरेंद्र मोदींकडून कंपनीचे अभिनंदन
अग्नीबाण मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पेस स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉस कपनीचे कौतुक केले आहे. पीएम मोदींनी म्हटले आहे की, “अग्निबान सॉर्टेड-०१ मिशनच्या लाँच पॅडवरून यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अग्निकुल कॉसमॉसचे अभिनंदन. ही इंजिन चाचणी अग्निकुलच्या स्वतःच्या डेटा संपादन प्रणाली आणि फ्लाइट संगणकांद्वारे समर्थित आहे, जी 100 टक्के इन-हाउस डिझाइन करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, चाचणी वाहनाच्या संपूर्ण प्रणोदन प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी SOrTeD वाहनाच्या संपूर्ण एव्हियोनिक्स साखळीची क्षमता देखील सिद्ध करते. 300 किलोग्रॅम ते अंदाजे 700 किमी उंचीच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम, अग्निबान कमी आणि उंच अशा दोन्ही कक्षांमध्ये पोहोचू शकते आणि ते पूर्णपणे फिरते. हे 10 पेक्षा जास्त लॉन्च पोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी डिझाइन केलेले आहे.