pune porsche accident : पबच्या परवान्यांची झाडाझडती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्यालयाचे परवाने दिल्याचे समोर आले असून, पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिका आणि इतर ग्रामीण भागांत सुरू असणार्‍या बार, मद्यालये, पब आणि रूफ टॉप, मद्य विक्री केंद्र यांना परवाना देताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे किंवा …

pune porsche accident : पबच्या परवान्यांची झाडाझडती

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्यालयाचे परवाने दिल्याचे समोर आले असून, पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिका आणि इतर ग्रामीण भागांत सुरू असणार्‍या बार, मद्यालये, पब आणि रूफ टॉप, मद्य विक्री केंद्र यांना परवाना देताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे किंवा नाही याचे दप्तर मागवले आहे. त्यामुळे नियमबाह्य देण्यात  आलेले परवाने, तसेच नियमांची पायमल्ली करणार्‍या परवानाधारकांवर टांगती तलवार आहे.

घटनेनंतर उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलिस प्रशासन, महापालिका, आरटीओ, आरोग्य विभाग आदी विभागांतील यंत्रणेने एकमेकांकडे बोट दाखवले. उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करून दाखल गुन्ह्यांबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला जातो. परवाने रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे अधिकार असल्याचे सांगत उत्पादन शुल्क विभागाचे पुण्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी हात वर केले. मात्र, परवाना देताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, जागेच्या निश्चितीसाठी पोलिसांची परवानगी, व्यवसाय परवाना, औषध प्रशासनाची परवानगी, पार्किंग नियोजन आदी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. त्यासाठी तात्पुरती मंजुरी घेऊन नियमबाह्य मद्यालये सुरू ठेवली जातात. त्यांना दंडाचा धाक नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी एका मद्यालयाच्या सुनावणी प्रक्रियेत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याने संबंधित मद्यालयाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय दिला. माझ्या निर्णयाच्या विरोधात संबंधित मद्यचालक अपिलात जाऊन उत्पादन शुल्क आयुक्तालयात दाद मागितली. आयुक्तांनी विरोधात निकाल देऊन मद्यालयाला परवानगी दिली. कायद्यातील अशा पळवाटा काढून मद्यविक्रेते बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत. परंतु, अनधिकृत परवानाधारकांना लगाम लावणे गरजे असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील सुरू असलेल्या सर्व मद्यालयांच्या परवानाधारकांना परवाने देताना जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

हेही वाचा

पतसंस्थेत सव्वादोन कोटींचा अपहार; तिघांवर गुन्हा
Nashik | ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी टाहाे अन् मोर्चा
जिल्हा गौणखनिज चोरी; नियंत्रण पथकच तडजोडीत मग्न