भारताच्या प्रज्ञानंदने ग्रॅडमास्टर मॅग्नस कार्लसनला चारली धूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने (R Praggnanandhaa) बुद्धिबळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. प्रज्ञानंदने बुधवारी (दि.२९) स्टॅव्हेंगर येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनवर (Magnus Carlsen) पहिला क्लासिकल विजय नोंदवला. भारतीय ग्रँडमास्टरने खुल्या विभागात एकमेव आघाडी घेतली आहे. या विजयासह १८ वर्षीय आर. प्रज्ञानंदने कार्लसनच्या …

भारताच्या प्रज्ञानंदने ग्रॅडमास्टर मॅग्नस कार्लसनला चारली धूळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने (R Praggnanandhaa) बुद्धिबळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. प्रज्ञानंदने बुधवारी (दि.२९) स्टॅव्हेंगर येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनवर (Magnus Carlsen) पहिला क्लासिकल विजय नोंदवला. भारतीय ग्रँडमास्टरने खुल्या विभागात एकमेव आघाडी घेतली आहे.
या विजयासह १८ वर्षीय आर. प्रज्ञानंदने कार्लसनच्या घरच्या मैदानावर झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. बुधवारी ‘नॉर्वे बुद्धिबळ २०२४’ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्सन कार्लसनवर मात केली. त्याने तिसऱ्या फेरीच्या शेवटी ९ पैकी ५.५ गुण मिळवले. दुसरीकडे, अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियो कारुआनाने बुधवारी जीएम डिंग लिरेनवर विजय मिळवून तीन गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
प्रज्ञानंदनेचे हे मोठे यश आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषकात तो मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला होता. क्लासिकल बुद्धिबळात कार्लसनला पराभूत करणारा प्रज्ञानंद हा केवळ चौथा भारतीय आहे. दुसरीकडे, प्रज्ञानंदची बहीण आर वैशाली हिने नॉर्वे बुद्धिबळाच्या महिला गटात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
हेही वाचा : 

अनन्या पांडे हॉट…; रियान परागची यूट्यूब हिस्ट्री व्हायरल
उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते है!; गंभीरची प्रतिक्रिया